पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणे वा माहेरच्यांनी लेकीला पहायला येणे. त्यात अधिकाचा महिना. आला, जावयाने ठरवले की अचानक निर्मलाच्या वडिलांच्या.... सासऱ्यांच्या दारात जायचे, अधिकाचे धोंडे खाऊन मोटारसायकलच्या पैशाची वसुलीही करून घ्यायची. सुधाकर एक दिवस अचानक सासऱ्यांच्या दारात मोटारसायकल घेऊन उभा राहिला. निमूला बालाजीला पाठवल्याचे सांगितले. सारं काही झकास चाललं आहे, याचा निर्वाळा दिला आणि मोटारसायकलचे हप्ते भरले नाहीत तर गाडीवर जप्ती येईल. असेही सांगितले. सासऱ्याने इकडून तिकडून हातमिळवणी करून दोन हजार रुपये जावयाच्या हातात ठेवले. पुरणांच्या धोंड्याचे वाण जावयाला दिले नि वोळवण केली.
 ....निमूला यात्रेला नेण्याचा देखावा सासूने केला. पण तिची, बालाजीची यात्रा झाली वरच्या अडगळीच्या खोलीत. त्या खोलीत निमूला कोंडून ठेवले. सर्व खिडक्या बंद, दाराला कुलूप, विधी करण्यासाठी एक घमेले ठेवले. एका भिंतीच्या वरच्या व्हेंटिलेटर मधून जाळीमधून हवा नि उजेड येई त्याचीच काय ती सोबत. रात्री बारा वाजून गेल्यावर सासू येई. दरवाजातून एक चतकोर भाकरी; वाटीभर पाणी देई. दिवसभरातील घाण नाकाला पदर लावून इकडे तिकडे बघत वाहेर टाकी. पुन्हा दरवाजा बंद, असे महिन्यांमागून महिने जात होते. चार महिने झाले तरी निमूला मारून टाकून तिची विल्हेवाट कशी लावायची याचा मार्ग सापडत नव्हता. सुधाकर नि त्याचा बाप दोघेही पोलिस विभागातले. त्यामुळे कायद्याची भीतीही वाटत असणार. निमूला मारून तिचे तुकडे करून ते बाहेर नेण्याचाही घाट घातला. सुधाकर तसा बिनडोक्याचा. त्याने कडबा कटर आणला आणि रात्री एक-दीड वाजता निमूच्या हाताच्या बोटाचे पेर कडबाकटरमधून कापले. जीवाच्या आकांताने ती किंचाळली नि मग सारे घरच घाबरले. तिचा आवाज आजूबाजूच्या लोकांनी ऐकला तर धोकाच होता. मग कडबाकटरचा बेत रद्द झाला. निमू उपासमार, घाण यांनी 'नैसर्गिकरित्या' मरावी म्हणून इतरही उपाय केले जात. तिला मुंग्या लागाव्यात म्हणून भोवती साखर पेरली. तिचे मन खचावे म्हणून समोर कॉट ठेवून त्यावर जाते, दगड, बांधलेला बिछाना वगैरे सामान ठेवले. सहा महिने उलटले. डोक्याला तेल नाही. अंगाला पाणी नाही. पोटात रोज वाटीभर पाणी नि चतकोर भाकरीचा खुराक जात होता. त्यामुळे अंगावरचे नसलेले

निर्मला
७१