पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातून समागम सुखाचा अनुभव घेतलेल्या तरुण परित्यक्तांना शारीरिक भावनांतून होणारी गुदमर अधिक त्रासदायक होते. मनस्विनीसारख्या संस्था आर्थिक पुनर्वसन सहजतेने करू शकतात. पण अशा स्त्रियांचे भावनिक पुनर्वसन कसे करायचे? हा प्रश्न नेहमीच अस्वस्थ करतो. आणि या प्रश्नाविषयी खुलेपणानी बोलणे संस्थेच्या दृष्टीने अनेकांना धोक्याचे आणि गैरसोयीचे वाटते. ग्रामीण परिसरात परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करणे ही जणु एक परीक्षाच. दाटलेली संध्याकाळ. भणाणणारे वारे. दिवली पदराआड झाकून पल्याड न्यायची आहे. दिवली विझता कामा नाही नि पदरही जळता कामा नाही.
 ही एक दैवा आम्हाला माहीत झाली म्हणून! अशा हजारो 'दैवा' घर .... आपलं घर शोधताहेत! त्यांना मिळेल का घर? की रस्त्यारस्त्यावरचे ढाबे, चहाची दुकाने, हॉटेलंच त्यांनी सजवायची? त्यांचे दैव कुणाच्या हाती?



दैवशीला
५५