पान:तर्कशास्त्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, Կ\9 तर्कसिद्ध लक्षण (व्याख्या). ५३. पदार्थाचें * लक्षण ” याचा साधारणतः अर्थ * त्या पदार्थाचें स्वरूप दर्शविणारें वर्णन ? असा आहे. केवळ शाड्रिक स्पष्टीकरणापासून तर्कसिद्ध लक्षण हें अगदीं भिन्न आहे. जर्से, ' विशद ? या शब्दाचा अर्थ जेव्हां मुलास समजत नाहीं तेव्हां तो ‘ स्पष्ट ? असें आपण सांगतो, किंवा ' श्रुनामय' ह्मणजे 'आरोग्य ? असें आपण ह्मणती, हैं केवळ स्पष्टीकरण झालें. व शब्दांचें स्पष्टीकरण करणें हैं। कोशाचें काम आहे. परंतु लक्षण सांगावयाचें झाल्यासू, ज्या पदार्थाचे সাম্যান लक्षण सागावयाच आह त्याच स्वरूप उघड कलं पांहजी. ६४. ज्या वस्तूंचें ज्ञान होतांना तार्किक विचाराची एकादी क्रिया घडते-ह्मणजे फक्त गुणवाचक व जातिवाचक वस्तू-त्या वस्तूंचें मात्र तर्कसिद्ध लक्षण आपणांस सांगतां येईल. ह्मणजे व्यक्तिवाचक पदार्थीचें लक्षण आपणांस कधींही सांगतां येणार नाहीं. कारण त्यांतील गुण असंख्य असल्यामुळे ते सर्व उघड करून त्या पदार्थाचें स्वरूप सांगतां येणें केवळ अशक्य आहे. फक्त इतर पदार्थीतून तो ओळखून्. काढितां येण्याजोगीं त्या व्यक्तीची कांहीं चिन्हें सांगणें-यालाच वर्णन ह्मणतात. एवढेंच कायतें आपणांस शक्य आहे. गुन्हेगार धरण्याकरितां * पांच फूट उंच, विरळ केस, घारे डोळे, उजव्या गालावर एक वण ? असें त्याचें वर्णन पोलिसांत प्रसिद्ध झालें असतें. रेल्वेगाईड सारख्या पुस्तकांतून याचप्रमाणें