पान:तर्कशास्त्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

tাই तर्कशास्त्र, व ' जातिज्ञान ' यांना ' वस्तुज्ञाना 'चे विभाग ह्मष्टले काय, किंवा पृथकरण हटलें काय, सारखेंच आहे. १२. पृथकरणाच्या योगानें पदार्थीचे भाग समजल्यावर, संकलनक्रियेनें ते सर्व एकत्र केले असतां मूळचा पदार्थ तयार होतो असें आपणांस दाखवितां येईल. भाग एकत्र केल्यानें मूळचा सबंद पदार्थ बनतो असें आपणांस सिद्ध करितां आलें, ह्मणजे पूर्वीचें पृथकरण विनचूक झालें असें समजण्याचा तो एक ताळाच आहे. जो विषय अगदी नवीन आहे व ज्यांत आजपर्यंत कांहींच शोध झाले नाहींत अशा विषयाचा अभ्यास करितांना, आपणास पृथकरणापासूनच प्रारंभ केला पाहिजे. परंतु पृथकरणांत आपणांस बरेंच यश आल्यावर तें पृथकरण योग्य झालें आहे कीं नाहीं हें ताडून पहाण्याकरितां पुन्हां संकलन करणें हें फार उपयोगाचें आहे. व ते विषय ज्या शास्त्रांत येतात त्याचें विवरणही संकलनाच्या पद्धतीनेंच करणें सोयीचें होईल. उदाहरणार्थ, रसायनशास्त्रांत पदार्थीचीं मूलतत्वें कोणती आहेत ही दाखविल्यानंतर आपणांस त्या मूलतत्वांपैकी एक एक घेऊन सर्व पदार्थीच्या रचनेचा उलगडा कसा करितां येईल हैं दाखवितां येतें. तसेंच तर्कशास्रांत वस्तुज्ञान, विधान व अनुमान याप्रमाणें * विचारां 'चें । पृथक्करण केल्यावर आपण यांपैकीं प्रत्येक्राची पूर्ण माहिती करून घेतो, व नंतर ते सर्व मिळून एकंदर अनुमानात्मक बुद्धिव्यापार कसे होतात हैं दाखविताँ,