पान:तर्कशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. 8ኗ उत्पन्न होणारीं ? * एका दलापासून होणारीं ? व ‘ द्विदलापासून होणारी ” असे विभाग करितीं. या प्रत्येक विभागाला मुख्य जातीचें नांव देतां येईल, ह्मणजे * एका दलापासून होणारी झाडें, ' ' द्विदलापासून होणारी झाडें? असें आपणास ह्मणतां येईल. तर्कसिद्ध विभाग मुख्यत्वेंकरून जातिज्ञानाच्या ' संख्यागमा ' च्या अनुरोधार्नेच होतो. व जितका * गुणागम ' संख्यागमार्ने दर्शविला जात असेल, तेवढ्याचीच या विभागांत जरूर असते. ‘ तकैसिद्ध ? विभागा संबंधीं नियम खालीं दिल्याप्रमाणें आहेत:- ४६. पहिला नियम,-नवीन जेोडलेल्या विशिष्ट्र चिन्हांच्या अनुरोधानें विभाग केला पाहिजे, व तोच विशिष्ट्रचिन्हें शेवटपर्यंत धरलीं पाहिजेत. आपण असें पाहिलें आहे कीं, उच्च वर्गीकरण करितांना ( कलम २६ पहा. ) नीच वर्गीकरणांतील कांहीं * विशिष्ट चिन्हें? आपण सोडून देतो जसें, ' कुत्रा ? यापासून 'मांसभक्षक? ही जाति करितांना ' मांसभक्षणा ' खेरीज कुत्र्याचे इतर सर्व गुण आपण टाकून देतो. व नीच वर्ग करितांना उच वर्गातल्या विशिष्ट्रचिन्हांस कांहीं अधिक विशिष्ट्रचिन्हें आपण जोडितों. जसें, ' झार्ड ? याचा विभाग करतांना, * दलापासून उत्पन्न होणें ? हा आपण एक नवीन गुण जोडतों, व ' एका दलापासून ? उत्पन्न होणा-या झाडांचा एक वर्ग करित व ' द्विदलापासून ? उत्पन्न होणा-या झाडांचा दुसरा वर्ग करितों. ' तार्किक विचार? याचे तीन भाग केले आहेत; पहिला, वस्तुज्ञान, यांत फक्त वस्तूंचें t