पान:तर्कशास्त्र.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ तर्कशास्त्र. ਸੱਵਲੀ হুম্বন্ধু স্কা मरेते ' याचा विचार करितानां, पार्शी लोकांतील मृत्युसंख्येसबंधानें केली. परंतु पुढे 'बाँबे ग्रॅज्युएट्सू असोसिएशन'च्या विद्यमानें होणाच्या वार्षिक भाषणांत कै. न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे याणीं ही चूक दुरस्त केली. ज्या लोकांना खतः विचार-करण्याची आवड नसते, किंवा स्वतंत्र रीतीनें-म्हणजे दुस-याचे म्हणण्यावर अवलंबून न राहतां स्वतःचे मेहनतीनें-शोध लावण्याची हैौस नसते, अशांवर स्वर्मताभिमानी लोक वरील रीतीनें आपली चांगली छाप बसवितात. १००. ( ७ ) परिणामांवरून अनुमान काढणें.- ज्या केवळ सार्वजनिक उपयुक्ततेच्या गोष्टी आहेत त्याविषयीं असें अनुमान काढण्यास हरकत नाहीं. उदाहरणार्थ, दारू पिणें, जुगार खेळणें, बाहेरख्याली करणें इत्यादि व्यसनें बंद करण्याकरितां एखादा कायदा करण्याबद्दल जर कोणी सुचना पुढें आणली, तर त्याचा विचार करितांना या व्यसनांच्या परिणामांवरून खुशाल अनुमान करावे, पण अशा कायद्यापासून इष्ट हेतु साधेल कीं नाहीं एवढें मात्र पाहिलें पाहिजे. परंतु जेथें एखाद्या नवीन सिद्धांताची अगर हकाची बाब असते त्या ठिकाणीं आपण एकदम परिणामांवरून अनुमान काढं नये. कांहीं लोकांचा खभावच असा असतो कीं, एखाद्या नवीन शास्त्रीयशोध लागला म्हणजे त्यापासून लोकांची धर्मश्रद्धा कमी होईल किंवा एकाद्या जुन्या लोकरूढीस विरोध येईल व त्यामुळे फार वाईट परिणाम होतील म्हणून त्या शोधाचा सर्वतः धिःकार करावयाचा. परंतु