पान:तर्कशास्त्र.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

° ge तर्कशास्त्र, मिळाला असतां, त्यांतील प्रत्येक पलटण व प्रत्येक शिपाई, जुरी त्यानें जय मिळूविण्यास किंचित् देखील मदत केलेली नसेल, तरी त्या कीतींचा वांटा आपणांस मिळावा अशी इच्छा करितो, ती याच रीतीनें. पुष्कळ लोक खालीं लिहिल्याप्रमाणें अनुमान करितात:- जी असामान्य गोष्ट नव्हे ती घडेल असें मानणें सयुक्तिक आहे; (समुदायवाचक) खेळांत जय मिळणें ही असामान्य गोष्ट नव्हे; (व्यनिवाचक) .". खेळांत जय मिळणें घडेल असें मानणें सयु क्तिक आहे. जो मुलगा खालीं लिहिल्याप्रमाणें अनुमान करीत असतो तो हाच हेत्वाभास करितो:-माझ्या खाऊच्या पैशापैकीं अमकी एक रकम मी एक जरीचीं टोपी विकत घेण्यांत खर्च केली तरी मला संकट पडणार नाहीं, व तितकीच किंमत देऊन एक कांचेचा गणपती घेतला तरी मला कर्ज काढावें लागणार नाहीं, व तेवढीच रकम देऊन तें चित्रांचें पुस्तक विकत घेतलें तरी माझे सर्व पैसे संपणार नाहींत, आणि यावरून तो असें अनुमान करिता । कीं, हे 'सर्व' जिन्नस आपुल्यास खरेदी करितां येतील हीच चुकी, पण उलट रीतीनें, खालील अनुमानूत 嗣 जाते. जेव्हा एकाद्या कृपण मनुष्य़ाकडे धर्मकृत्यूंच्या वगेणीच्या एकामागून एक मागण्या येऊं लागतात तेव्ह तो, आपण 'सर्व' धर्मकृत्यांस वर्गणी देऊं लागलें तर