Jump to content

पान:तर्कशास्त्र.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ तर्कशाखें. वते असे आहेत कीं, ते आपल्या भाषणांतील प्रत्येक वाक्यांत या प्रकारचा प्रमाद करीत असतात; व कांहीं ग्रंथकार असे आहेत कीं ते प्रत्येक पानांत ही चूक करितात, व त्याचें कारण हैं असतें कीं, उघडपणें व स्पष्ट रीतीनें त्यांना कांहींच लिहितां येत नसूर्त: ह्यूम नावाच्या इग्रज इतिहासकाष्ट्रावृष्यू असलाहल आह कीं, ‘ आपणास सिद्ध करितां येईल त्यापेक्षां अधिक फारसें न सांगतां, स्वतःच्या मतास अनुकूल अशा एकूण एक गोष्टी मीठचा ठसकेदार शब्दांनीं तो लिहित असती, पण प्रतिकूल गोष्टी आल्या कीं बेट्यानें गाडी कुंकलीच ! ? ८६. संकर या सदराखालीं येणारे हेत्वाभास. वस्तुज्ञान होतांना, विधान करितांना, व अनुमान करितांना ज्या निरनिर्गुळ्या प्रकारच्या घोंट्ळ्यांत आपण पडण्याचा सुभव आह त सव प्रकार स्पष्ट्रपण दाखवून त्यासबधान होणा-या चुका दुरस्त करणें हें तर्कशास्त्राचें काम आहे. वस्तूंचें खरें स्वरूप व वस्तूंचा परस्पर सबंध न समजल्यामुळे ज्या चुका होतात त्यानांच संकर-हेत्वाभास हैं सामान्य नाम दिलें आहे. उदाहरणार्थ, आपण अनुमानोत्तींत अशा एका शब्दाचा उपयोग करीत असू कीं त्याची फक्त कांहीं अस्पष्ट कल्पना आपल्या मनांत आलेली असेल. एखादे वेळीं तो शब्द जातिवाचक असतो, परंतु त्या जातींतील सर्व पदार्थ कोणत्या समानधर्मीनीं एकत्र बांधले गेले आहेत हें आपणूस माहीतू नसतें, व युामुळे अनुमानोत्तींत हे सुमानधर्म एके वेळी अगके आहेत असें आपण समजतों व दुसरे वेळी