पान:तर्कशास्त्र.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. 象のい。 करीत आले आहेत. यांत शब्दयोजना अशी केलेली असते की, तीतून वास्तवीक अर्थ तर निघत असावा, प्रतु ऐकणा-यांना त्याचा एक निराळाच अथे वाटावा. जो पुरुष अशा नीच युक्त्यांचें अवलंबन करती, तो असत्य भाषणाच्या पापापासून आपण दूर आहों असें समजत असेल; परंतु खरी गोष्ट ही असते की, त्या अख्रत्य भाषणाबरोबर निंद्य कावेबाजपणाही असल्यामुळे, तें पातक द्विगुणित होतें. याच हेत्वाभासाशीं निकट साम्य असलेला ८४- ४. खोटा आव घालणें-हा हेत्वाभास होय. याचा उपयोग दरबारी लोक व हांजी हांजी करणारे लोक नेहमीं करितात. हे आपल्या भाषणांत सत्याचा अतिक्रम न करितां, त्यांतील शब्दांच्या वाच्यार्थांखेरीज इतर पुष्कळ गोष्टी ऐकणा-याचे ध्यानांत येतील अशी शब्दयाजना करितात. जेव्हां एकाद्या निंदकास दुस-यावर कोणताही आरोप उघडपणें आणण्याची छाती होत नाहीं, तेव्हां तो याचा उपयोग करती. व जेणेंकरून ऐकणाराचे मनांत कांहीं भयंकर संशय उत्पन्न होईल अशा रीतीनें कोणत्या तरी कृष्ण कृत्याबद्दल संदिग्ध बोलत असती. खरा गुन्हेगार जेव्हां आपण अगदीं निरपराध आहर्णे व आपणावर ही नाहक तोहमत आणली आहे अशा आशयाची मुखचर्या करतो, किंवा अशा गुन्ह्याचा आरोप आपणावर केल्याबद्दल, सदुणी मनुष्यास क्रोध येईल तसा आपणांस आल्यासारखे दर्शवितो, तेव्हां तो याच हेत्वाभासाचा उपयोग करीत असतो. कांहीं ፃ ሬ