पान:तर्कशास्त्र.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा Rek एक अनुमानापासून दुसरें अनुमान, दुसयापासून तिसरें, असें भराभर तो काढीत जाती. परंतु हें अनुमान कोणत्या रीतीनें आपण काढिलें किंवा आपण कोणकोणत्या पायव्यांनीं गेलों, हेंही कदाचित् त्याला बिलकुल सांगतां येणार नाहीं. याशिवाय ही एक गोष्ट नेहमीं ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, केवळ साहचर्याच्या योगानें ज्या कल्पना आपल्या मनांत उद्भवतात, तें (तर्कशास्त्राच्या नियमांप्रमाणें) शुद्ध अनुमान होत नाहीं. आमची अशी समजूत आहे कीं, ज्यांनां आपण पशृंनीं किंवा मुलांनी केलेली अनुमानें ह्मणतों त्यांपैकीं बरींच केवळ साहचर्याच्या योगानें झालेलीं असतात. एकदां पाय भाजलेलैं मूल अगर कुनें पुन्हां विस्तवाजवळ जाण्यास भितें, हें केवळ साहचर्याच्या नियमामुळे घडतें. मनुष्यें, आपल्या सर्व आयुष्यांत, ज्या ज्या प्रसंगीं अनुमान करितात असें आपणांस वाटत असर्त त्या त्या प्रसंगी, कमी. किंवा अधिक अंशानें, त्यांच्यू मनांवर केवळ साहचर्याचा परिणाम घडत असतो. त्यांचें व्यवहारांतील वर्तन कोणत्याही प्रमाणपंक्तीच्या अनुरोधानें होत नसतें, तर तें केवळ त्या वेळीं त्यांस होणा-या स्फूर्तीप्रमाणें घडत असतें. या कारणामुळे ज्या चुकांचा संबंध विचारशक्तीशीं बिलकुल नाहीं अशा अनेक चुका त्यांचे हातून सदोदित घडत असतात. प्रत्येक शुद्ध विधानाचा व निगमनरूपी विधानाचा मुख्य हेतु वस्तूंच्या परस्परसंबंधाचें निरीक्षण करणें हा आहे; व फक्त वर लिहिलेल्या अनुमानपद्धतीनेंच आपणांस शुद्ध व निर्दोष निगमन काढितां येईल. या साहचर्यज्ञानास केवळ मदत