पान:तर्कशास्त्र.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा १७५ ६२. प्रत्येक प्रकारच्या शोधांत प्रत्यक्ष प्रमाणू पाहू जाण व्यथे आहे. पदार्थीच्या एका नियमित वर्गापुरतेंच प्रत्यक्ष प्रमाण सांपडू शकतें, व या पदार्थीतील विशेष गुण हाच असती कीं ते नेहमीं साधे व गुणवाचक असतात. बहुतेक शास्त्रांमध्यें प्रत्यक्ष प्रमाण मिळत नाही; उदाहरणार्थ, रसायनशास्त्र, सूष्टपदार्थशास्त्र, मानसशास्त्र व अर्थशास्त्र यांपैकी एकांतही तें मिळत नाही. दररोजच्या व्यवहारकृत्यांत तर तें पाहण्याचे भरीसच कोणी पडत नाही. एकाद्या मनुष्याचे घरास आग लागली तर पाण्यानें आग नेहमीं विझलीच पाहिजे असें जरी प्रत्यक्ष प्रमाणानें त्यास सिद्ध करितां येणार नाही, तरी तो त्या आगीवर. पाणी ओतावयास लागेल. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, आत्म्याच्या अविनाशित्वाबद्दल, पापाबद्दलच्या दंडाबद्दल, व हिंदुधर्मीच्या सत्यतेबद्दल जीं प्रमाणें दर्शविली जातात तीं सर्व नैतिकच असतात. या प्रमाणाची ज्यांना किंमत करितां येते व हें प्रमाण पाहण्यास जे आधींच उत्सुक आहेत अशा मंडळींकरितांच हें प्रमाण पुढें आणलें असतें. अशा प्रमाणावर विश्वास ठेवणें हें पुण्य आहे आणि अविश्वास ठेवणें हें पाप आहे असेंही कांहीं लोक समजतात, ६३. वाचकांस हैं विषयांतर झालें असें वाटेल याकरितां तें सोडून आपण प्रस्तुत विषयाकडे वळू. हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, अनुभवजन्य प्रमाणावरून उत्पन्न होणारी सवै अनुमार्ने अरिस्टाटलच्या प्रसिद्ध नियमाखालीं येतात, व हें अनुमान खरें होण्यास त्यांत,