पान:तर्कशास्त्र.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ तर्कशास्त्र, उपायाची सूचना राजुसुभेपुढे आणतांनुा युत्सद्यास व्र एकाद्या सकटाच्या मांहमंवर जातांना संनापतीस, केिती गोष्टींचें मनन करावें लागतें बरें! अत्यंत घोंटाळ्याच्या बाबी असतांही, त्यांपैकीं कोणती गोष्ट अधिक संभवनीय आहे. हें ज्या व्यवहारज्ञानाच्या योगानें मनुष्यास जाणतां येतें तें व्यवहारज्ञान सर्वात अत्यंत उपयोगी आहे, ( ४ ) अनुभवजन्य प्रमाणांत जबाबदारी मुळीच नाही, कारण तें सर्वास खरें मानलेंच पाहिजे, र्त कोणाच्या मजींवर अवलंबून नाहीं. जसें, ‘ विषमांमधून सम वजा केलें तर बाकी विषम राहतात; अगर समद्विभुज त्रिकोणांतील खालचे दोन कोन परस्परांबरोबर असतात ' हैं खरें मानण्यांत आपली प्रशंसाही नाहीं, व अपकीर्तिही नाहीं. ज्याला एकदां हे सिद्धांत व त्याबद्दलचें प्रमाण ( प्रमाणाची जरूरच वाटेल तर ) चांगलें समजलें आहे त्याला ते सिद्धांत खरे मानणें भागच आहे. अनुभवजन्य प्रमाणाची गोट याच्या अगर्दी उलट आहे. हें प्रमाण एकृादा मनुष्य खरें मानील किंवा न मानील; व त्याप्रमाणें तो वर्तन करील किंवा न करील. व मनुष्य जसा। असेल त्याप्रमाणें पक्षपातित्वाचा किंवा निःपक्षपातित्वाचा परिणाम या ठिकाणीं त्याचे मनावर घडण्याचा संभव आहे. याच कारणाकरितां अनुभवजन्य प्रमाणाला gF布刃 वेळी नैतिक प्रमाण असेंही ह्मणतात, कारण हैं प्रमाण आपणांस कधीं मान्य होईल व कधीं होणार नाही, व ती क्रिया नैतिक दृष्ट्या कधीं येोग्य असेल कधीं अयोग्य असेल.