पान:तर्कशास्त्र.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. & R सिद्धांत पाहिजे लागतातः मध्यपदाशीं अंत्यपदांपैकी एकेकाची तुलना ज्यांत आपण करतों असे दोन सिद्धांत, व या अंत्यपदांची परस्परांशीं तुलना ज्यांत आपण करित असा तिसरा एक सिद्धांत. यापैकीं पहिल्या दोन सिद्धांतांना प्रतिज्ञा व तिसयाला निगमन असें ह्मणतात, हैं उघड आहे कीं, प्रत्येक प्रतिज्ञेत मध्यपद येईल, परंतु निगमांत तें येणार नाहीं. अनुमानांतील तीन्हीं सिद्धांत अमक्याच रांगेनें यावेत अशी मुळींच जरूर नाहीं, व म्हणून तसा नियमही तर्कशास्त्रांत कोठं सांगितला नाहीं. पदांचा परस्परसंबंध कोणता आहे एवढेंच कायतें आपणांस पाहिलें पाहिजे; व ती संबंध आपण स्पष्टपणें सांगितूला म्हणजे मुगु प्रतिज्ञेपासून प्रारंभ केला काय, किंवा दोन्हीं प्रतिज्ञांपैकीं कोणतीही एक प्रथम सांगितली काय, एकूच आहे. जसें. वर सांगितलेला सिद्धांतांचा क्रम न ठेवितां आपणांस असेंही म्हणतां येईल कीं,- गोपाळा जानवें घालते; कारण, गोपाळा ब्राह्मण आहे; व, सर्वे ब्राह्मण जानवें घालतात वर दिलेल्या लक्षणांवरून व ठोकळ वर्णनावरून, प्रत्येक प्रकारच्या अनुमानास लागू पडणारे असे कांहीं नियम आपणांस मांडतां येतील, ते असे:- ८. ( १ ). अनुभानांत फक्त तीनच पर्दे असलीं पाहिजेत, याचें स्पष्टीकरण पूर्वी केलेंच आहे.