पान:तर्कशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ९३ ह्मणजे झालें, त्यायोर्गे पहिला सिद्धांत आपोआपच सिद्ध केल्यासारखा होईल. कारण पहिल्या सिद्धांताची सत्यता दुस-या सिद्धांताच्या असत्यतेंत अंतर्गतच आहे. भूमितींतील सिद्धांतांत युक्रिड साहेबानें या पद्धतीचा बरेच वेळां उपयोग केला आहे. त्यानें असें दाखविलें आहे कीं, त्यार्न सांगितलेल्या कल्पनेहून निराळी कल्पना केली असतां, एखाद्या सवेमान्य सिद्धांताच्या विसंवादी सिद्धांताचें प्रतिपादन केल्यासारखं होतें. तर्कशास्त्रामध्येंही कोठं कोठं याच पद्धतीचा उपयोग केला आहे हें आपणांस पुढें दिसून येईल. ३१. विवादामध्यं प्रतिपक्षास उत्तर देणें तै, विरोधी किंवा ईषद्विरोधी सिद्धांताच्या रूपानें न देतां, विसंवादी सिद्धांताच्या रूपानें देणेंच योग्य होईल. असें न केल्यास, वाद करणारे कितीही भांडले तरी वाद कधींच संपावयाचा नाही, व वादांत येथूनतेथून सर्व गोंधळ व घंटाळा होऊन जाईल. एक ह्मणेल कीं 'मनुष्यें विश्वसनीय आहेत,' दुसरा ह्मणेल कीं 'मनुष्यें विश्वसनीय नाहींत.” व प्रत्येक पक्षास वाटेल तितका पुरावा मिळाल्याकारणानें या भांडणाचा कधींच शेवट व्हावयाचा नाही. परंतु दोन्हीं पक्षांस आ• पल्या प्रतिज्ञा अशा रूपानें करूं द्या कीं, ‘ सर्वे मनुष्यें विश्वसनीय आहेत ? व ‘कांहीं मनुष्यें विश्वसनीय नाहीत? ह्मणजे आपोआप वादाचा काय तो निकाल लागेल. एक ह्मणेल कीं ' इतिहास, पदार्थविज्ञान इत्यादि शाखें प्रत्येकानें शिकलींच पाहिजेत? दुसरा ह्मणेल कीं 'यांची कांहीं जरूर नाही.' या ठिकाणी कांहीं अंशीं, प्रत्येकाचें म्हणणें बरोबर आहे, व प्रत्येकाचें चूक आहे. परंतु एक जर