पान:तरंग अंतरंग.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... आणि ब्रह्मदेव रडू लागला आयुष्यभर आपण काय केलं, हा मिलियन डॉलरचा प्रश्न. शरीरानं मागणी केलेले सगळे चोचले पुरे करण्यातच आपली पुरती दमछाक झालेली आहे, हे आता लक्षात येऊ लागलं आहे. अगदी इलेक्ट्रिक पंखा पण नव्हता. तेव्हा साधा हातात घेऊन हलवायचा तट्ट्याचा पंखा होता. तोच नंतर वाळ्याचा झाला. मग टेबल फॅन आला. मग सिलिंग फॅन, मग एसी, तरी समाधान नाही ते नाहीच. तेंव्हा पायात साधी चप्पलही नव्हती. आणि आता दहा हजार रुपयांचे बूटही टोचतात. शरीराचे सारे डोहाळे पुरवले; पण आत्मा बिचारा तसाच राहिला. शरीर चैन करतंय; मन आणि आत्म्याला ओरबाडत - ओरबाडत.... म्हटलं, 'चला, आत्म्याला घेऊन चक्कर मारू.' सरळ अंबाबाईपुढं डोळे मिटून उभा राहिलो. आपल्या शिवरायांची माता; तीच आपली पण. डोळे भरून आले. केव्हाही जा, डोळ्यांत सारं प्रेम साठवून, आशीर्वाद देऊन, तुमच्यात भरोसा ठासून भरून मगच निरोप देते. तुम्ही फक्त एकच काम करायचं, जाता-जाता सायकलवरून उजवा हात कपाळाला हात लावून नव्हे, तर मनापासून एक घडीभर तिच्या पायाशी डोळे मिटून फक्त आत्मभानही विसरून बसायचं तेंव्हा कळतं, आईचा आणि माझा आत्मा 'सेम टू सेम.' गणपती बाप्पाशी तर लहानपणापासूनच गट्टी बेभान नाचत मंडळाचा गणपती वाजत-गाजत आणायचो; अगदी घरचाच वाटायचा. विसर्जनाच्या वेळी बाप्पाला पोचवताना रडू यायचं. इथंही आत्मा जुळलाच आणि थेट कैलासी पोचलो. भोळ्या शिवाच्या किंचित हास्यानंदेखील टिपूर चांदणं सुसाट पसरू लागलं. मी थक्क होऊन चौफेर पाहू लागलो, तसं कार्तिकेयश्री म्हणाले, "या स्वच्छ चांदण्यासारखा आत्मा ठेवला पाहिजे.' ब्रह्मदेवानं मन आणि आत्मा सर्वांत शेवटी घालून, मग परिपूर्ण मानवी शरीरात अलगद प्राण फुंकले होते. अगदी बारीकसुद्धा डाग ठेवला नाही ना मनावर, ना आत्म्यावर. लहान मूल हसतं, तेव्हा तुम्हाला ईश्वरी रूप अवतरलंय, असं वाटतं. आत्मा स्वच्छ ठेवा, आरशासारखा, लहान मुलांच्या हसण्यासारखा. श्रीकृष्णाचा आणि तुमचा आत्मा, तुम्ही त्याच्या सतत निकट राहावं म्हणून एकच केला. खरं तर साऱ्यांचाच आत्मा एक आहे; फक्त शरीरं वेगळी. बहुधा तिथंच चुकलं. तुम्ही शरीरावर प्रेम केलं, आत्मा मात्र बेसहारा झाला. त्याच्या चिंध्या चिंध्या केल्यात. मन बेताब केलं, बेकाबू केलं. आता ऐक, मनावर डाग पडत जातात, तसं जडत्व येऊन तुम्ही तिथंच फिरत राहता. एखाद्याला देवमाणूस म्हणता ना तुम्ही, तो मुक्त झालेला असतो. डागाचं ओझं नसतं त्याच्या खांद्यावर इथलं टिपूर चांदणं अशा अगणित आत्म्याचं आहे. चांदण्यांचा आस्वाद घेताना आनंदी होता ना तुम्ही, मग स्वतःच चांदणं का होत नाही ?" विचार करुन करुन माझा मेंदू जड दगड होऊन गेला. प्रथा, रूढी, परंपरांचा तरंग अंतरंग / ८२