पान:तरंग अंतरंग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आदर करता-करता आयुष्यभर आपल्याच सग्या- सोबत्यांबरोबर जिव्हारी बोचणारा विरोध करताना, काही वेळा क्षणिक लाभापोटी, हव्यासापोटी, वृथा दंभापोटी पण; असं मन सतत डागाळत राहिलं. आता पुढच्या जन्मात पहिल्यापासूनच निष्पाप लहान मुलाचं मन आयुष्यभर जपलं पाहिजे. शरीरातून मन बाहेर काढून, हातात सदरा धरावा तसा धरून बघितलं, तर मनावर डागच डाग, किती झटकलं तरी जिद्दी डाग फिके पण झाले नाहीत. रागाचे, लोभाचे, ईर्षेचे, मत्सराचे, लालसेचे, वृथा पराभवाच्या अपमानाचे उट्टे काढण्याचे, कुणाच्या शारीरिक व्यंगावर, रंगावर बोलल्या गेलेल्या शब्दांचे कळत न कळत पडलेले पक्के होत गेलेले डाग. अरेरे, काय घेऊन जन्माला आलो आणि आता काय बाळगून आहोत ! सुदैवानं डाग सोडून उरलेला मनाचा अंगरखा काही निरपेक्षित सेवेमुळे असेल कदाचित; पण स्वच्छ होता. नशीब. तसं लाडक्या गणपती बाप्पानं मनातलं ओळखून माफ करून टाकलं आणि म्हणाले, " पुढच्या जन्मासाठी पुन्हा जन्मल्यावर नव्हे, आतापासूनच कामाला लाग. म्हणजे पुढच्या जन्माचे कुकर्माचे भोग कमी होऊन कर्मयोगी होशील. " आता डोक्यात प्रकाश पडला, कर्मसंचिताचा... ऋषि-मुनी, संत सज्जनांनी सतत स्वतःच्या वागण्यातून साधी, सहज, निरपेक्ष, जगावर प्रेम करायला शिकवणारी वाट आखून दिली आहे. कुणी बरोबर येवो, वा न येवो... सर्वांचंच हितचिंतन करणारी वाट. त्यावरून चालत चालत थकून गेले. आपसूकच वैकुंठाच्या वाटेवर चालते झाले. आपण मात्र स्वतःच्याच तोऱ्यात स्वतःला 'विजेते' समजत आपल्याच वाटेवर चालत राहिलो, वैकुंठाचं विमान आल्यावर फक्त टाळ्या वाजवत राहिलो. मनाला एकदाही त्या विमानप्रवासाचा विचारही शिवला नाही; 'बिझनेस क्लास' डोक्यात ठाण मांडून होता ना ! देवानं इतका अद्वितीय देह निर्माण केला आहे. इतकं सुंदर, कोमल, कुणाच्याही दाहक नजरेनं घायाळ होऊन ढसाढसा रडणारं मन निर्माण केलं. 'न भूतो न भविष्यति' असा नितळ आत्मा तयार करून हा मानव निर्मिला. पण आज सरळसरळ गळ्यावर सूरी ठेवून मान धडावेगळी करणारी ही निर्लज्ज, बेशरम, निर्दय जनता पैदा झालेली पाहून ब्रह्मदेव आणि विश्वकर्मा गळ्यात गळे घालून ओक्साबोक्शी रडत होते. काय कमी पडलं असावं? अजून काय करायला हवं होतं ? ब्रह्मदेव आणि विश्वकर्म्याच्या पायावर डोकं ठेवलं, न कळत अश्रूंचा 'अभिषेक' सुरू झाला. तेंव्हा ब्रम्हदेव म्हणाले, "थांब, एकट्या-दुकट्यानं रडून काही होणार नाही. जरा थांब. हा नरसंहार, ही इर्षा, ही हाव, हा टोकाचा मत्सर, राग, दुसऱ्याचं सर्वस्व हडपण्याची लुटारू वृत्ती, सारंच आता गाळून घेत आहोत. " तरी एक काळीज चिरत जाणारा दीर्घ उसासा टाकत ब्रम्हदेव म्हणाले, "जन्मल्यावर मातेकडे पाहून पहिलं निरागस हास्य टाकून मातेला धन्य-धन्य करणारं मूल मोठं झाल्यावर मातेचा इस्टेटीसाठी सरळ कुन्हाडीनं खून करू शकतं..... ही ‘निर्मिती' आमची निश्चितच नव्हती. मग ती मानवानं, एखादा रोबो करावा तशी केली ८३ / तरंग अंतरंग