________________
"उतर माझं राज्य मानवा, तुझं ठिकाण आलं." किती वेळ वर बसलो होतो, कुणास ठाऊक. पटकन् खाली उडी टाकली. "थँक्स रे यमराजा मला स्वर्गात आणलं का नरकात ?" असतात - "म्हणजे?" यमराज आश्चर्यचकीत झाले. "आता असं बघा, हितं दोन राज्य एक नरक आणि एक स्वर्ग." हे आम्हाला पृथ्वीवर जन्मापासून माहित आहे आणि 'तुम्हाला कसं काय माहीत नाही ? थट्टा करता काय गरिबाची ?" "बरं, यमराजा तुमची जात कुठली ?" मी रेटून म्हणालो. (आमची आडनावावरनं नाय कळली, तरी जात विचारायची सवय इथं आलं तरी तशीच. ) "हितं तसं काही नाही. ' यमराज एकदम चिडून म्हणाले. "हे बरं आहे तुमचं ! तुम्ही इथं बिनजातीचं राहा आणि आमच्यात रोज भांडण लावा." मी जरा टोमणाच मारला यमराजाला. इतका वेळ शांतपणे आमचा संवाद ऐकणाऱ्या रेड्याच्या डोळ्यातून जाळच बाहेर पडायला लागला होता. मागच्या पायाच्या खुरांनी माती उकरतो की काय असं वाटायला लागलं. पण यमराजांनी एकदा हात फिरवल्याबरोबर शांत झाला तो. "आम्ही तुम्हाला जातीचा शिक्का मारून पाठवलं नव्हतं." यमराज गुश्शातच बोलले. एवढं वाक्य मी पाजळलेली अक्कल ठिकाणी आणायला पुरेशी होती. "बरं, ते जाऊ दे, मला तहान लागली आहे." पाणी घेऊन एक माय आली. "बस राजा. दमला असशील," म्हणत ओंजळीत पाणी ओतू लागली. पाणी कसलं ते अमृतच; खरंच फार गोड होतं. "हे काय पाजलंस माय ?" "अरे बाबा हे पाणीच की. 11 "पृथ्वीवर मिळतंय तेच की. हे बघ, हित जे-जे बघशील, ते-ते तसंच पृथ्वीवर विश्वकर्माजींनी बनवलं आणि मानवाला तिकडं पाठवलं बघ." "मला सांग, तिकडं सगळं बरं आहे ना ?" "कसलं बरं, आम्ही तर सगळी पार वाट लावून टाकली गो माय." माऊलीला काय आणि कसं सांगू? आणि मला अश्रू आवरेचनात. एकंदरीत, इथली सगळी आमच्याच कर्माची कथा आहे तर..... इकडं फिरत-फिरत चाललो, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान, तृप्ती दिसत होती. ओळख असो नसो, हात जोडून हसत-हसत नमस्कार केल्याशिवाय कुणी पुढं जात नव्हतं; आणि आम्ही ? पुढारी दिसला की वाक कमरेत, जरा घामट- मळकट दिसला की सर बाजूला. मला तर प्रत्येकाचे पायच धरावंसं वाटलं. गरम-गरम भाकरीचा खमंग वास आला तसं मी थबकलो. लगेच एक माय येऊन हात धरून पाटावर बसवून गेली. आपल्या मनातलं यांना कसं काय कळतं, कुणास ठाऊक! माझी आई पण आमच्याकडे 'वार लावण्या'साठी विद्यार्थी आला की, चेहऱ्यावरनंच ओळखून अगोदर जेवायला वाढायची. कुठं घालवले ते दिवस आपण ? तिचीच आठवण झाली तरंग अंतरंग / ८०