या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
हातात शेवटचा शेवटचा घोट करत, बाटली संपवत आलेला; तरी एक वेगळीच तरतरी असलेला दोस्त म्हणाला, "अरे, ती मनाची का कसली सफाई म्हणालास, एक वेळ करशील रे. पण आजपर्यंत 'कायमचूर्ण', 'सुखसारक' आणि अनेक देशी- विदेशी औषधे घेऊनही दोन-दोन तास स्वच्छतागृह अडवणाऱ्या तुझ्या पोटाची सफाई कशी काय करणार ?" माझ्या उजव्या पायाच्या तळपायाने त्याच्यावर शाबासकी देऊन हातातल्या बाटलीसकट एका क्षणात त्याला रस्त्यावर रवाना केला आणि भसाड्या श्वासाने रामदेवबाबांची 'भस्रिका ' सुरु केली. ७७ / तरंग अंतरंग