पान:तरंग अंतरंग.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'सफाई' अभियान 'मन करा रे निर्मळ।' एवढा एकच मंत्र साधू-संत सांगून गेले; पण त्यातलं मर्म जाणून घेणं, हे येऱ्यागबाळाचं काम नाही, इतकेच. इतक्या लांबलचक जगून झालेल्या आयुष्याकडे घायाळ नजरेने पाहिल्यावर आयुष्य संपत आल्यावर थोडे- थोडे उमगायला लागल्याचा भास होतो आहे. पण दारू सोडलेल्या 'तळीरामा' सारखी अवस्था 'मन निर्मळ करण्याच्या' प्रतिज्ञेबाबत होते. म्हणजे कसे, शेजारी बसलेल्या दोस्ताने, "एक घोट घे रे तेवढ्याने काही प्रतिज्ञा ब्रितिज्ञा मोडत नाही.. ...आणि नाही तरी तू काही भीष्म नव्हेस." अशी वाक्ये प्रतिज्ञा मोडायला पुरेशी असतात. आपण भीष्म नाही, यात न पटण्यासारखे, मनावर खोलवर परिणाम करून, मन ढवळून काढणारे असे काहीच नसते. इथेच आपल्या मनाचा मासा शेजारी घट्ट बैठक ठोकून बसलेल्या दोस्ताच्या गळाला आपसूकच लागलेला असतो. असो. मी अशा मन निर्मळ वगैरे करण्याचा विडा उचललेल्या मंडळींना एका धोक्याच्या घंटीची बारीक किणकिण ऐकवली, एवढेच. 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' झालाच तर उशिरा का होईना कळावे ...एवढेच! पण मी आता फसणार नसतो. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी यमदेवाचीही प्रार्थना, माझ्या प्रार्थनेस हजेरी लावणाऱ्या इतर पाच-पन्नास देवांच्याबरोबरीने आणि तितक्याच श्रद्धेने करतो. मला या यमदेवाबद्दल आणि त्याच्या 'स्वच्छता' अभियानाबद्दल आपल्या पंतप्रधानांइतकाच नितांत आदर आहे. आपण राडेराड केलेल्या मोठमोठ्या गटारीत 'ते' भयाण भुयाराचे झाकण उघडून बिनदिक्कत आत उतरून काम करणाऱ्या स्वच्छतादूतांबाबतही तितकाच आदर आहे. लाख वेळा सांगूनही निर्लज्जपणे गटारात अथवा रस्त्यावर न टाकायचे प्लास्टिक, रस्सी, जुन्या चड्ड्या अशा उद्वेगजनक वस्तू काढून तो शांतपणे झाकण लावतो. लगेच दुसऱ्या 'उच्चभ्रू' गटारीकडे वळतो. अशा स्वच्छतादूतावर इतका आदर ठेवलाच पाहिजे. केवढं जबाबदारीचं, 'स्वच्छते 'चं काम ब्रह्मदेवाने यमदेवावर सोपवलंय. मानवाच्या मृत्यूनंतरची व्यवस्था नसती तर...! बेवारशी माणसांची होणारी मरणोत्तर कुतरओढ आपण अत्यंत निर्ढावलेल्या निर्लज्जपणे पाहतोच की, 'कुत्ता जाने, हड्डी जाने' इतक्या त्रयस्थपणे.... तर या यमदेवाला मी नेहमी प्रार्थना करतो की, 'बाबा रे, तुझ्या लिस्टप्रमाणे जेव्हा - केव्हा माझा नंबर असेल, तेव्हा तू बिनधास्त ये. आनंदाने मी तुझ्याबरोबर येईन. निर्घृणपणे तरुण, निष्पाप कळ्यांना कुस्करून टाकणाऱ्या राक्षसालाही त्याची शेवटची इच्छा विचारतात. तेव्हा तेवढी सवलत तू मला देशील, असे समजून मी माझी ही इच्छा तुझ्यापुढे ठेवतो.' आज अचानकच या प्रार्थनेला चक्क यमराज उत्तर देते झाले. साक्षात अवतरलेच समोर. त्यात यमराज आज बऱ्या मूडमध्ये असावा. किंवा ७५ / तरंग अंतरंग