Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जबाबदारीचा आणि माझा ऑफिसच्या गुलामगिरीचा शीण स्वर्गीय आनंदाच्या मऊशार दुलईत अजरामर करायचा असतो. आजवरच्या असल्या साऱ्या क्षणांची शिदोरी बांधूनच परतीच्या प्रवासाची, कधी न कधी तयारी करायला लागणार. याची एक करुण किनार पण असते. माझ्या ओठावर घट्ट बोट दाबून स्वतः कुठल्याही परिस्थितीत प्रवासाला अगोदर निघणार असल्याची प्रतिज्ञाच तिनं केलेली असते. पिल्लांना शेवटपर्यंत पोरकं वाटू न देण्याची जबाबदारी मोठ्या अधिकारानं अगोदर माझ्यावर सोपवून खट्याळपणे ती निवांत झालेली असते. उद्या रविवार, त्यामुळे लवकर उठायचा प्रश्नच नसतो; पण आमच्या सासरेबुवांची पहाटे साडेपाचला उठवून पर्वती चढण्याची भलतीच खोड, तिच्याही रक्ताच्या थेंबाथेंबात भिनवलेली असते. आणि पुणेरी खट्याळपणा तर तिच्या पाचवीला पुजलेला. सात वाजताच तिला वडिलांनी भेट दिलेल्या घड्याळाच्या आपोआप बंद न होणाऱ्या गजराने माझा हात पोचणार नाही, एवढ्या अंतरावरुन आपले काम सुरू केलेले असते. किल्लीही पूर्ण दिली असणार, हे अनुभवसिद्धच होते. एवढ्यात, महान सज्जनतेचे भाव चेहऱ्यावर ओढून, नुकत्याच न्हालेल्या केसांच्या स्वैर मुक्त बटांतून थेंबे थेंबे ठिबकणाऱ्या गरम गार पाण्याचा शिडकावा माझ्या झोपेचे सोंग घेणाऱ्या चेहऱ्यावर दवबिंदूसम हळुवारपणे अलगदपणे पसरला. ओठाच्या कोपऱ्यात न आवरणारे हसू लपवून, उलटे मलाच 'गजर आणि कशाला लावलात ?,' म्हणत केसांच्या गडद सावलीनं घुसमटून टाकलं. "चल, आज आपण 'पर्वती'वर जाऊया का?" मी उचंबळून आलेली जास्तीत जास्त जवळीक साधण्याचा एक बापुडा प्रयत्न केला. "का? आज रमीची चौकडी कुठं ट्रीपला गेली की काय ?" समस्त नारी समाज 'नर्सरी- केजी'तच 'केजीबी' किंवा 'रॉ'चे पाठ गिरवतो की काय कुणास ठाऊक! 'पर्वती'च्या नावे दाखवलेला 'नैवेद्य' फुकट गेलेला असतो. आणि "तुला जायचं मनात नसलं तर राहू दे," असे म्हणत सारा ओलावा मी लपेटून घेतलेला असतो. आता कुठं खरा रविवार उगवला असतो. तरंग अंतरंग / ७४