पान:तरंग अंतरंग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... आणि रविवार उगवला कधी-कधी झोपेतून उठल्या उठल्या नामांकित कामे आठवून एकदम उत्साहानं कामाला लागावं असं वाटतं. मग एरव्ही दोन-दोन दिवस टाळलेली दाढी किंवा माध्यान्हीनंतर करावीच वाटली, तर करायची अंघोळ हा आपला ब्रँड होऊन बसलेला आहे. भल्या सकाळी अंघोळ करायला मी न्हाणीघरात घुसताना बघून, असली संधी कोण सोडणार, या विचारानं बायकोनं हॉलची एरव्ही संध्याकाळी उघडायची खिडकी खाडकन् उघडून दूर आभाळी नजर फेकली. तरी तिची एक तिरकस नजर माझ्या 'बाथरूम पदार्पणा'कडेच होती. तिच्या मनातलं काळंबेरं ओळखायला मला तिची मिश्किल उडती नजर पुरेशी होती. मी दोन्ही भुवयांची कमान करत, डावा हात सुटू शकणाऱ्या टॉवेलला घट्ट धरत उजव्या हातानं काय बेत आहे, असा खोचक इशारा केला. तितक्याच खोचकपणे तिने नजर वर्तुळात फिरवत, 'काही नाही, सूर्य पश्चिमेला उगवला की काय बघत होते,' असा प्रतिसाद दिला. "प्रत्येकवेळी तुझं माहेर पुण्याचं आहे, हे सिद्ध करायलाच पाहिजे का ?" असलं काहीतरी अस्पष्टपणे बरळत "देवा तिला क्षमा कर, ती पुण्यात जन्मली, हा काही तिचा दोष नव्हे, " म्हणून कमरेचा सुटणारा टॉवेल आवरून मी धाडकन् बाथरुमचे दार लावले. बाहेरून खदखदून हसण्याचा आवाज आला. आई शप्पथ...! पसाभर मोगऱ्याच्या कळ्या एकदम उमलून घमघमाट सुटल्यासारखं वाटलं आणि अंघोळीच्या आधीच मी आनंदात विरघळून गेलो. व्वा... ! आज सकाळ तर मस्त उगवली. फुलांनी, तुळशी, बेलपत्रांनी सजवलेली होती. अगरबत्तीचा घमघमाट हावरटासारखा भरून घेतलेली. आई जगदंबेचा प्रसन्न चेहरा पाहून तृप्त झाल्यासारखी उगवली होती. बघता-बघता फोनाफोनी, पेपर वाचन इत्यादी सकाळी योजलेली सारी कामे पार पडली. 'अन्नपूर्णे'च्या हातचेच सुग्रास भोजन आणि मस्त आळसावलेली गाढ वामकुक्षीही साधली होती. बघता-बघता पश्चिमेचा गार वारा आणि मावळतीची लाल गुलाबी सोनेरी किरणे एखाद्या बालकाच्या सहज हालचालीसारखी हॉलमधून, खोल्यांतून रांगत होती, बागडत होती. वास्तविक, आपण तेच असतो; बायकोही तीच असते, तीच झोपायची खोली, तेच घर, सगळं सगळं तसंच ते तरीही कधी कधी 'तोच' हा दिवस बघा बरं कसा सोनियाचा उगवतो. शनिवार संध्याकाळची सारी आन्हिके दोघांनी मिळून अपार सुखा-समाधानात पार पाडलेली असतात. आज ती गोपी झालेली असते. मलाही हातात पावा घेऊन शक्य तेवढ्या मधुरपणे तिला नादसुरात न्हाऊ घालायचं असतं. गुलाबी पाकळ्यांचा पाऊस पाडायचा असतो. तिला जवळ ओढून 'सांज ये गोकुळी...'च्या शांत मऊ-मऊ सुरात कानात राऊळीच्या घंटेचा सौम्य, पवित्र, मंजुळ आवाज ओतायचा असतो. आज मोगऱ्याच्या झाडावरचा सारा बहरच शय्येवर उतरलेला असतो. साऱ्या आठवडाभराच्या तिच्या घरकामाच्या ९७३ / तरंग अंतरंग