पान:तरंग अंतरंग.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"ऐकलं का ? चहा टाकणार का ?" प्रश्न पुरा व्हायच्या आत हातातल्या तबकामध्ये दोन चांदीच्या भांड्यात चहा घेऊन त्या आल्या होत्या. गृहिणी ही अशी असावी लागते बघा. काही सांगावंच लागत नाही.. एक भांडं पुढं करत शास्त्रीबुवा म्हणाले, "हं. बोला. " "शास्त्रीबुवा, मला वाटतं, आमच्या या पेशामध्ये मन शांत असावं लागतं, आणि त्यासाठी ध्यानधारणा वगैरे उपयोगी होईल का, असा माझा प्रश्न आहे." ते हसून म्हणाले, निश्चितच; पण तुमच्यामागे दिवसभर पन्नास-शंभर माणसांच्या तक्रारींची वटवट ऐकून शांती मिळणार कोठून एवढा वेळ आहे का तुम्हाला ?" तेवढ्यात माझ्या खिशातल्या फोनची घंटी वाजली. ते हसत म्हणाले, "सत्य आहे. बघा, आलाच कॉल." मी फोनला जुजबी उत्तर देऊन फोन खिशात टाकत त्यांना म्हणालो, " म्हणूनच म्हटलं, असं मला जमेल का ?" हे बघा, डॉक्टरांची ध्यानधारणा म्हणजे मनात कुतुहलापोटी विचार न करणे. निर्विकार रहाणं मन पटकन् तुम्हाला एकाग्रता शिकवू शकेल. " शास्त्रीजी, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. अहो, सतत विचार येणे, मनातल्या मनातच आपल्याला पडणारे प्रश्न आणि आपणच हुडकून त्याला दिलेली उत्तरं. हा सारा गमतीदार खेळ माझ्या मनात सतत सुरू असतो. हल्ली तर मनात येईल तसं लिहिण्याचाही मी प्रयत्न करतो. " " याचा अर्थ, तुम्ही दोन टप्प्यांवर एक काम करता. ' 11 "जेव्हा तुम्ही मन पूर्ण निर्विकार कराल, तेव्हा तुम्हाला वेगळं लिहायचं कारणच नाही पडणार. तुम्ही आणि आत्मा एकरूप व्हाल. बऱ्याच वर्षांची साधना आहे ही. अहो, एवढ्या छोट्या वयात ज्ञानेशांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली, हे केवढं अवघड काम ! आपण एवढे मोठ्ठे झालो, तरी त्यांनी लिहिलेलं समजणंही किती अवघड ! तुम्ही देहभान विसरून जाल. रात्री वेळी-अवेळी कितीही वेळ ध्यान केलेत, तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दमल्यासारखं वाटणार नाही. लगेच सुरू करा. मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष देऊ नका. कंटाळून ते दूर जातील. " "फक्त नित्यनेमानं ठराविक वेळी ही साधना ठेवा.' "तुम्ही कर्मयोगी आहातच; आता आत्मयोगी व्हा. 11 दोघांनाही नमस्कार करून मी बाहेर पडलो. कितीही प्रयत्न केला तरी विचारांची गुंतवळ थांबत नव्हती. मला एक वेगळाच 'साक्षात्कार' झाला. काहीही केलं तरी मी माझ्या मनात अखंड चाललेल्या विचारमालिकेतून मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत समाजात आजूबाजूला चाललेल्या उद्रेकी चळवळी, स्टेशन, फुटपाथ, उद्ध्वस्त धर्मशाळेत कुठे ना कुठे सतत दिसणारे उपाशीपोटी झोपणारे, माणुसकीला दुरावलेले, जनावरांहूनही तीव्र हेटाळणी भोगणारे जीव रस्त्याच्या कडेला अपुऱ्या कपड्यानिशी कुडकुडत, पाय उपाशी पोटाशी ७१ / तरंग अंतरंग