पान:तरंग अंतरंग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१) तुमच्यापैकी कुणीही मुलींच्या शाळा सुरू व्हायच्या किंवा सुटायच्या वेळी तेथे टारगटपणा न करता, दूर उभे राहून तसल्या टारगट पोरांना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. २) तुम्ही कुठल्याही जात किंवा धर्माच्या नावावर माझ्यासाठी मते मागायची नाहीत. ३) कधीही कुठलेही मोर्चे काढून एसट्या, गाड्या जाळायच्या नाहीत. आपले काम निष्ठेने करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करायची नाही. ४) रोज सकाळी फिरायला जाताना आपल्या वॉर्डमधल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरून जाऊन कॅरिबॅग व इतर कचरा गोळा करून कुंडीत जमा करायचा. त्यासाठी हॅन्डग्लोज वगैरे आमची 'कट्टा गँग' देईल. ५) प्रत्येक गल्लीची पाच व्यायामपटूंची टीम करायची. तिने स्त्रिया व मुलींना आगाऊ व टारगट लोकांपासून पोलिसांच्या सहाय्याने मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्ण सुरक्षितता पुरवायची. तुम्ही सगळ्यांनी फक्त आपला वॉर्ड असा नीटनेटका, सुसंस्कृत, सुरक्षित केलात तर, हे लोण शहरातल्या सगळ्याच वॉर्डात पसरेल आणि आपले शहर नामांकित होईल. " माझ्या सूचना वजा अटी ऐकूनही सर्वच मुलांच्या डोळ्यांतली चमक मला नव्या युगाची सुरुवात आमच्या गावापासून होणार, याची हमी देऊन गेली.. आजोबा उठा... चहा झालाय चहा..." माझी नात मला उठवत म्हणाली, "आज दुपारीच एवढी गाढ झोप कशी लागली आणि झोपेत हसत का होतात ?" आता काय सांगू तिला ? देश गेला खड्ड्यात म्हणत जात, धर्म, प्रांत, पक्ष आणि बजबजलेल्या खाबूगिरीच्या जोरावर दादागिरी करून सामान्य जनतेला वेठीला धरून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या उत्कर्षासाठीच झटणाऱ्या पुढारीदादाकडून देश सोडा, वॉर्डाचं तरी भलं होणार का ? आता या साऱ्या फक्त स्वप्नांतच बघायच्या गोष्टी राहिल्यात, असं सांगून तिचा भविष्यकाळ अंधारलेला का करू मी? ६९ / तरंग अंतरंग ܀܀܀