पान:तरंग अंतरंग.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बघून ये, म्हणतील; पण "यहाँ खड़ा होके, बिना हालचाल करके सारी बत्तीया गिन। " झालं. मग मुकाट्यानं ते लाईट, बॉस बास म्हणेपर्यंत मोजत उभं राहायचं; ते ही न हालता. सर्वांत भयानक म्हणजे ओळींनी सात दिवस शत्रूच्या हद्दीत घुसावं लागलं, तर काय करायचं, याचं ट्रेनिंग. बापरे.. ! ॲकॅडमी सोडून पळून जावं वाटायचं; पण 'तुम्ही भारत देशाचं संरक्षण करणारे शूर शिपाई आहात, ' याची वरचेवर देण्यात येणारी सुखद जाणीव मान ताठ करायला पुरेशी असायची. हे शिक्षण संध्याकाळी सात वाजता सुरू व्हायचं. पाठीवर मणभर वजन घेऊन 'त्या' दऱ्या- डोंगरातून चालायचं. काटेरी झाड, ठेचकाळून रक्त काढणारे दगड-धोंडे चुकवत गप मुकाट्याने, कुणालाही चाहूल लागू न देता चालत राहायचं. कधी लीडर थांबला की थोडं थांबायचं. डोळ्यांतली पेंग एखाद्या झाडाला टेकून घायची. अर्धवट झोपेत लक्षात यायचं की, जरा जास्तच वेळ डुलकी मारली. मग सोबतच्या साथीदाराच्या पाठीवर झोपेतच थाप मारत "चल यार, म्हणण्यासाठी हात त्याच्या पाठीवर मारल्यावर लक्षात यायचं की, साथीदार केव्हाच पुढं गेला आहे आणि हात झाडावर आपटला आहे. खडबडून जाग यायची. आजूबाजूला कोणी नाही लक्षात आलं की, सगळ्यांना गाठायला ते पाठीवरचं दगडी ओझं घेऊन पळत सुटायचं. रात्री अडीच-तीन वाजता थांबलं की, उजाडण्यापूर्वी, लपून बसण्यासाठी पुन्हा चर खणायचा. दिवसभर त्यात लपून बसायचे. पुन्हा संध्याकाळी सातला हीच रपेट सुरू. याला 'भदराज' म्हणायचे. (बहुधा शरीराचं भदं करने का ये राज होगा । ) " असलं हे 'भयानक' ट्रेनिंग केव्हा संपतंय आणि छातीवर मानाचा बिल्ला आई- वडिलांच्या समोर केव्हा लागतोय, याची स्वप्नं बघत शरीर आणि मन दगडाहून घट्ट - घट्ट होऊन जायचं. मनात ऊब असायची, ती सतत केव्हा न् केव्हा राष्ट्रासाठी प्राणपणाने लढायची संधी मिळणार, या विचारांची. आणि... ऊब आई-वडिलांच्या हस्ते जन्मभर छातीवर गर्वाने बाळगायच्या विविध पदांच्या फितीची... या भारतमातेच्या लाखो शूर, कणखर वीरांना दंडवत..! जय हिंद... जय हिंद की सेना...! ६७ / तरंग अंतरंग