पान:तरंग अंतरंग.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनावरांचे डॉक्टर एक आटपाट नगर होतं. वट्ट पाचशे वस्तीचं गाव. माप जनावरं, शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरं... इतकी, की दुरूनच शेणा-मुताच्या वासानं गाव आल्याचे कळे; पण गावची शाळा भारी होती. गुर्जी फार म्हणजे फार कष्टाळू रोज पारावर बसून दोस्ता - दोस्तांत चंच्या उघडून तंबाखू, चुना, पानं वाटून गप्पा चालायच्या. एका संध्याकाळी संभा लगबगीनं पारावर आला, म्हणाला, "उठा, अगुदर नाम्या बोम्बलायलाय. "काय रं बाबा, काय झालं?" एकानं विचारलं, "एक आठवडा झाला प्वॉट फुगलंय बैलागत, आणि पाय झाडाय लागलाय." "आरं, मग डाक्टरकड न्हेचिल का पारावर येशील ? आणि आठ दिवस काय पुरणपोळ्या खात व्हता व्हय नाम्या ?" "डाक्टर लगीन करायला गावी गेलाय. म्हयनाभर येत न्हाय. " असं सांगून गेलाय. संभाच्या या उत्तरावर सगळे डोकं खजवायला लागले. तसं शिरप्या म्हणाला, "जनावरांच्या डॉक्टरकडनं औषध आणू या." "आरं, येडा का खुळा ? त्यो का बरं दिल ? नाम्या काय बैल हाय ?" शिरप्या म्हणाला, "बैलाला प्वॉट फुगीवर बाटलीभर औषध देतोय की न्हाय ; मग नाम्याला चमचाभरच दे म्हणूया की. " आता मात्र सगळ्यांना ही आयडिया पटली. तशी ताडकन् सगळी उठली आणि जनावराच्या डॉक्टराच्या घराकडं निघाली. जनावरांचा डॉक्टर नुकताच जेवून आडवा झालेला. दार धाड धाड वाजवलं, तसं डॉक्टर सदरा घालत बाहेर आला. एवढी मंडळी बघून हादरला. "आपण दुपारी प्वॉट फुगीवर औषध दिलेला बैल मेला की काय ?" डॉक्टरांना गर्दी बघून शंका आली. "न्हाय, न्हाय, बैल मस्त चराय लागलाय; पण नाम्याचं प्वाँट बैलागत फुगलंय. त्याला औषध द्या." "अरे, डोस्कं फिरलंय काय तुमचं ? मी माणसाचा डॉक्टर नाही, तेव्हा नाम्याला तालुक्याला घेऊन जावा. " "न्हाय म्हणू नका. पाया पडतो तुमच्या नाम्या तालुक्यापर्यंत काय पोचत नाय बघा. सगळ्या मंडळींनी एकच गलका केला. सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडून शेवटी डॉक्टरनं 'काय झालं तर मी जबाबदार नाही, " या अटीवर चमचाभर औषध दिलं आणि पहाटेच आठवड्याभरासाठी सासरी निघून गेला. " आठवडाभरानं डॉक्टर परत आला तर गावात सामसूम. मनात चरकला. आता काय झालंय. विचारायचं तरी कुणाला ? कानोसा घेत डॉक्टर हळूच पाराच्या जवळ गेला. दुरूनच कान टवकारले. गप्पा तर मस्त हसत-खेळत चाललेल्या. डॉक्टरच्या जीवात जीव आला. पुढं जाऊन म्हणाला, "राम राम मंडळी, काय बरं आहे ना सगळं ?" "हा, हा, मजेत हावोत की सगळे " तरी डॉक्टरला ही इब्लिस मंडळी काय दाद देईनात. शेवटी डॉक्टरनं विचारलं, "तसं नव्हे, नाम्याला 'झाडा' झाला ना. 11 तरंग अंतरंग / ६२