पान:तरंग अंतरंग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रिय ऋषी, प्रिय ऋषी परवाच यु-ट्यूबवर अमेरिकेतील सर्वात मोठ्या सुप्रसिद्ध शाळेच्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून तुझा झालेला सत्कार डोळे भरून कौतुकानं पाहिला. तू केलेले भाषण कानात प्राण गोळा करून चिडीचूप शांततेत ऐकलं आणि आपल्या शाळकरी जीवनाचा सारा इतिहास डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकू लागला. तू आपल्या शाळकरी जीवनाला आपल्या गदगदलेल्या आवाजात छेडलंस आणि मी कान अजूनच तीक्ष्ण करून ऐकू लागलो. मारकुट्या, जमदग्नी अवतारातल्या केळकर सरांचा उल्लेख तू केलास आणि मी सावध झालो. चापून चोपून नेसलेले शुभ्र धोतर, तेव्हढाच शुभ्र सदरा आणि वर गडद निळा कोट घालून केळकर गुरुजी येत तेंव्हा वर्गात टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता असे. त्यांनी गणित शिकवलं ते उत्कृष्टचं ! पण गणित चुकलं की फाशीचीच शिक्षा ! चिमटीत मानगूट पकडून मांजराच्या पिलाला उचलतात तसं उचलत. त्यावेळी त्यांचे दंड बेडकीसारखे फुगत. तुझ्या भाषणातील शब्द न् शब्द माझ्या मनात रुंजी घालतोय. तू बोलत होतास..... आज कंपनीत सर्वोच्च पदावर मी आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांना माझ्या या यशाबद्दल आणि माझ्या शिक्षकांबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला निवडलेत याचे श्रेय त्यांचे ! त्यांची तलवारीच्या धारेवर चालण्याची शिस्त मी माझ्या जीवनात आणली. ती शिस्त रक्ताच्या थेंबाथेंबात ठासून भरली आहे! अमेरिकेत येण्यापूर्वी मी त्यांच्या घरी जाऊन वाकून नमस्कार करून निरोप घेतला. तेंव्हा त्यांचे डोळे आनंदाश्रूनी वाहत होते. म्हणाले होते, 'ऋषी, कुठंही गेलास तरी आपलं कुटुंब, वाडवडील, आपले गाव, आपली शाळा, आपले सारे गुरुवर्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गौरवशाली भारतदेशाचे तू प्रतिनिधित्व करणार आहेस हे विसरू नकोस ! आणखी एक लक्षात ठेव, 'ऋषिक'चा अर्थ इंद्रिये आणि 'ऋषीकेश' चा अर्थ इंद्रिये ज्याच्या सदैव ताब्यात असतात असा ! तुझ्या मनाला लाज वाटणारी छोटीशी सुद्धा गोष्ट तुझ्या हातून घडणार नाही, याची दक्षता घे! त्याच क्षणी आठव तू कुणाचा मुलगा आहेस. कुठल्या शाळेचा, कॉलेजचा विद्यार्थी आहेस. कुठल्या देशाचा नागरिक आहेस म्हणजे चुकूनसुध्दा, एका नव्या पैशाचीही गफलत तुझ्याकडून घडणार नाही, की पाऊल चुकीचं पडणार नाही ! आपली ही जाज्ज्वल्य परंपरा जपण्याची जबाबदारी तुम्हा तरुणांची आहे ! खूप मोठा हो!' आणि गुरुजींच्या वृद्ध आईंनी माझ्या हातावर दही घातलं होतं. सर्वाना दंडवत घालून त्यांच्या शुभेच्छांचं भलं मोठं समाधानाचं गाठोडं खांद्यावर घेऊन मी इथल्या विशाल विमानतळावर पहिलं पाऊल ठेवलं, अगदी भक्कमपणे ! शाळेत असताना मला गणितात शून्य मार्क्स मिळाले होते यावर तुमचा विश्वास बसणार नाही! पण ते सत्य आहे! माझा कान पिरगळत संपूर्ण वर्गासमोरच, बाकावरून तरंग अंतरंग / ६०