या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
तुझ्या आई-वडिलांना आणि आपटेकाकांना घेऊनच ये आणि तूच माधवाचे पैसे त्याचे त्यालाच दे." काका म्हणाले, “अरे, एकदम एका मुलीचे गाल लाल कसे झाले!” तशी मी पटकन् पायात चपला सरकवून, धडाधड पायऱ्या उतरत मागे वळूनही न पाहता स्कूटरला किक मारली.... ते थेट घरात येऊन आरशापुढं उभी. किती वेळ ऊर धडधडत होता कुणास ठाऊक! किंचितशा हसऱ्या गालातून शब्द बाहेर पडले - 'बरं झालं आपटे काका वाटेत भेटले, बरं झालं स्कूटर घेतली, बरं झालं पर्स नाही घेतली, बरं झालं पेट्रोल संपलं आणि बरं झालं तो रुबाबदार तरुण माधव देवधर नेमका माझ्या मागोमागच रांगेत उभा होता. ' ५९ / तरंग अंतरंग