पान:तरंग अंतरंग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मला पत्ता सांगता का," मी पुन्हा म्हटलं. मला केव्हा एकदा त्याचे उपकार फेडते, असं झालं होतं. " एवढी घाई असलीच तर एक काम करता का ? मी आत्ता मीटिंगमध्ये व्यस्त आहे. तुम्ही.... ' २१११, अनुराधा, तुळशीबाग हा पत्ता. गल्लीत वळल्यावर डावीकडून तिसरं घर माझं आहे." "थँक्स." असं म्हणत मी फोन ठेवला आणि एक विलक्षण योगायोग लक्षात आला. माझा स्कूटर नंबर पण २१११ ; माझं नाव आणि त्यांच्या बंगल्याचं नावही सेम. मी स्कूटर घेऊन निघाले आणि त्या गल्लीत शिरले. दारावरची बेल वाजवली. साधारण चाळीस-पंचेचाळिशीतल्या छान स्मार्ट स्त्रीनं दार उघडलं. माझ्या चेहऱ्याकडे पाहत अगदी ओळख असल्यागत हसत, "ये ना आत, ' म्हणत बाजूला झाली. मी म्हटले, 'नाही. मी फक्त तुमच्या मुलाचे पैसे परत करायला आले आहे." तिच्या आश्चर्यकारक चेहऱ्यावरून तिला यातलं काहीच माहीत नसल्याचे कळलं. तरी त्या गालातल्या गालात ओळख असल्यागत हसत म्हणाल्या, "बैस. आलेच." येताना एका हातात तांब्याचे भांडे घेऊन आल्या. "किती घाम आला आहे, अगोदर थंडगार पाणी पी." मी गटागटा, हवेच असलेले गार पाणी प्याले रुमाल काढून घामेजला चेहरा पुसला आणि पर्समधून पैसे काढून त्यांना देऊ केले. "अगं, बैस गं. केवढी गडबड ! तू नाही ओळखलंस, तरी मी तुला पाहिलं आहे. तू गोखल्यांची मुलगी अनुराधा ना?" "हो." मनात म्हटलं, बहुधा आईच्या हळदी- कुंकू मंडळ किंवा भिशीतल्या असाव्यात. सरळ आत चालत्या झाल्या. "काकू, मला चहा वगैरे काही नको आहे." त्या आल्या. त्या एकदम माझ्या अगदी जवळ चिकटूनच उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "हे बघ, मी इथं तुला पाहिलंय." आणि माझाच फोटो माझ्यापुढं धरला. मी अजूनच ओशाळले. पैसे धरलेल्या तळहाताला घाम फुटला. चक्क माझ्या दोन्ही गालांवर हात फिरवत हनुवटी कुस्करून म्हणाल्या, "अगदी फोटोत दिसतेस तशीच छान आहेस. माधवनचं तुला घरी पाठवलं असणार. अगोदर मला सांगावं की नाही यानं. असा लबाड आणि चेष्टेखोर आहे. तुझी कुठं गाठ पडली ? आणि पैसे कसले? त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. अहो देवधर, खाली येता का ? बघा, कोण आलंय." असं म्हणत हाका मारु लागल्या. तसं जिन्यावरून एक भरदार व्यक्तिमत्त्व माझ्यापुढे हसतच उभं ठाकलं. त्याचवेळी मगाचा आईनां देवधराना फोटो पसंत आहे म्हटलेलं एकदम आठवलं. आता माझ्यापुढे त्या दोघांना वाकून नमस्कार करणं एवढेच काम उरलं होतं. तरी हातातले पैसे बाईंच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न मी केलाच. "हे बघ, तू संध्याकाळी तरंग अंतरंग / ५८