पान:तरंग अंतरंग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"मॅडम, ओळखलं नाही मला भरा तुम्ही पेट्रोल." मागून कुणीतरी मला विचारत होते. "मी तुमच्याकडून घेतो नंतर पैसे." असे म्हणत त्याने माझ्या गाडीत पेट्रोल घालण्यास सांगितले. कसानुसा चेहरा करून, 'त्या' भल्या तरुणाला 'थँक्स' म्हणून एक लिटर इंधन टाकीच्या घशात कोंबले. कितीही उशीर झाला असला, तरी त्याचे इंधन भरून होईपर्यंत बाजूला उभे राहणे मला भाग होते. त्याचे इंधन भरुन झाल्यावर मी त्याला म्हणाले, "सॉरी, मी आपल्याला ओळखले नाही." "मॅडम, मी तुमचा विद्यार्थी, २०१२ चा पास आऊट." असे त्याने सांगितले तरी त्याला कधीही पाहिल्याचे मला मुळीच आठवेना; शिवाय मी नोकरीला लागलेच २०१६ ला. मग हा माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा कसा ? "तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. असं मी म्हणताच असू दे हो, तुमचं काम झालं ना. असं तो म्हणाला. तुमचा पत्ता, फोन नंबर द्या, मी लगेच पैसे पाठवते." मी गडबडीनं म्हटलं. यावर "अहो - जाहो का करताय ?" आणि "एवढ्याशा पैशासाठी केवढं टेन्शन." असं तो मिश्कीलपणे म्हणाला. माझ्या आग्रहापुढे मोठ्या नाईलाजाने त्याने आपला नंबर दिला आणि इतर काहीही न बोलता थाटात 'बाय' करून, माझ्याकडं ढुंकूनही न पाहता गर्रकन् हँडल वळवून पसार झाला. बराच वेळ त्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची छबी डोळ्यांपुढून हटेच ना. बराच वेळ आपलं काय काम होतं, हेच आठवता आठवेना. तो गेला, त्या दिशेने पाहत मी सीटवर तशीच बसून त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला; पण ओळख काही पटेना. मग लक्षात आलं, माझं काम होणं आता टळलेल्या वेळेमुळे शक्य नाही. त्यामुळे मुकाट्याने वैतागून घर गाठले. आपटे काका गेल्याचं त्यांच्या गायब झालेल्या जाडजूड चपलांवरून लगेचच कळलं. त्यातल्या त्यात बरं वाटलं. 11 'चला, प्रश्नांची सरबत्ती वाचली.' आई-बाबांची नेहमीप्रमाणे वरसंशोधन चर्चा सुरू होती. "अगं, अनुराधा काकांना घरी घेऊन आलीस बरे झाले. त्या देवधरांच्या घरी पत्रिका जुळती आहे, फोटो पसंत असल्याचा फोन आला आहे. हेच सांगायला आपटे काका आले होते. संध्याकाळी देवधरांकडे बोलावलं आहे? जाऊ या ना?" "थांबा जरा. अगोदर माझं एक काम मी तातडीनं पुरं करते मग बघू. "काय पोर आहे ही! अगं, परत कुठं निघालीस आणि ?" मी खसकन् पर्स ओढून आतला फोन काढून पेट्रोल बिलावर लिहिलेला त्या 'उपकारकर्त्या' चा नंबर लावला. "हॅलो, मी अनुराधा बोलते आहे." "माझा नंबर तुम्हाला कुणी दिला अगोदर सांगा. ' थोड्याशा रागातच त्यांनी विचारलं. "तुम्हीच." "आं...." "तुम्ही नाही का माझे पेट्रोलचे पैसे भरले." "हां हां. अहो काय मॅडम किती गडबड ?" "प्लीज, तुमचा ५७ / तरंग अंतरंग