पान:तरंग अंतरंग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे, हेही माहीत नाही. मी मात्र माझ्या पेटीत अशा अनेक दोस्तांना आवर्जून अजून सोबतीला घेऊन अनेक रात्री जागवतोय. आयुष्याच्या 'सांजसावली'त बसून मी एकटाच हे सारं चाळत बसतो. श्रावणसरीचा गारवा मोरपिसासारखा अंगावरून फिरतो. सारं शरीर मोहरून जातं. तप्त धरणीवर पडलेल्या चार पहिल्या पावसाच्या थेंबांचा मृद्गंध तासन्तास दरवळत राहतो. 'त्या' साऱ्या आठवणी, मी लौकिक अर्थानं मिळवलेली सारीच 'श्रीमंती' भिकारी ठरवून हसतात मला. पाहा, उत्तर पाठवावं वाटलं तर जरूर पाठव. माझ्या पेटीतल्या संपत्तीत अजून भर पडेल, एवढं नक्की...." तुझा, जीवन्या ५५ / तरंग अंतरंग ܀܀