Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"तुझ्या मुलांना हा खाऊ तरी घेऊन जा बाबा, नको म्हणू नकोस." बाबांनी तर त्याला मिठीतच घेतलं. ते इन्स्पेक्टर, हा टॅक्सीवाला आणि आपला एकुलता ... ! आजही आई-बाबा आपल्या मित्राकडे राहतात. आई-बाबाच्या खात्यात एक रुपया पण घर विकल्याचा आला नव्हता. सारे पैसे, कॅश घेऊन 'पोटचा दगड' निघून गेला होता..... काळाबरोबर माणसा-माणसातली बंधनं सैल झाली एकवेळ समजून घेऊ; पण ज्या एकुलत्या एक मुलासाठी सारे आयुष्य पणाला लावले, तो एवढा नीच होऊ शकतो, हे पचायला फार फार अवघड. (सत्यघटनेवर आधारित ; फक्त नावे बदलून कथेचे रूप दिले आहे.) ५३ / तरंग अंतरंग