पान:तरंग अंतरंग.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"उद्या रात्रीच्या विमानाने आपण चाललो भुर्रर्र..." "उद्याच म्हणजे फारच अवघड. अरे, घराची सोय लावू दे, एखादा भाडेकरू ठेवू दे." बाबा उमेशला अडवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. "आता विसरा ते. आपण सगळे अमेरिकेत राहणार, कायमचे." मी आपले इथलं घर विकले. उद्या दुपारी तुमच्या आणि आईच्या कॉमन अकाऊंटमध्ये सगळे पैसे जमा होताहेत. तिथून अकाऊंट 'ट्रान्सफर' करूया. मी असताना तुम्ही कशाला काळजी करता ? तुमचा मुलावर विश्वास नाही का ?" आई-बाबा निरुत्तर; पण आतून खूप गंभीर, हादरूनच गेले. एखाद्याच्या आयुष्यात संपूर्ण उलटापालट, एका दिवसात ? डोकं सुन्न झालं. मुलाच्या प्रेमळ आग्रहानं आणि नातवंडांच्या आठवणीनं विपरीत विचार आला नाही; डोकं मात्र सुन्न झालं. दुसऱ्या दिवशी कसाबसा सर्व शेजाऱ्यांचा निरोप घेतला आणि टॅक्सी मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली. आई-बाबांना त्यांच्या सामनासकट बाकावर बसवलं आणि 'चेक-इन' करायला उमेश गेला. बाकावर बराच वेळ स्वप्न रंगवत, गप्पा मारत आई-बाबा बसले. "मुलांच्या आवडीचा खाऊही घ्यायला वेळ नाही दिला यानं आता गेल्यावर मुलं गळ्यात पडल्यावर हातावर काय ठेवू हो ? इथं काही मिळतं का पाहता का?" तसे बाबा जाऊन छान 'कॅडबरी'चा बॉक्सच घेऊन आले. पाकिटात थोडेच पैसे उरले; पण आता फिकीर करायचं कारणच नव्हतं ना. इतक्या वर्षांनी मुलाच्या कुटुंबाला, नातवंडांना भेटण्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. बॉक्स व्यवस्थित सामानात ठेवला. विमान सुटण्याची वेळ झाली, तरी उमेशचा पत्ताच नव्हता. आता मात्र काळजी वाटू लागली. मरणाची गर्दी काहीच सुचू देईना. "तुम्ही पाहून येता का ?" आईचा धीर आता पुरता सुटला होता. तसे बाबा उठले. आयुष्यातला पहिला विमानप्रवास. कुठे चौकशी करावी, असा विचार करत इकडे-तिकडे पाहत राहिले. अमेरिकेच्या कितीतरी फ्लाईट्स, वेगवेगळ्या कंपन्यांच्या. आपलं कुठलं विमान होतं ? आपण उमेशला काहीच विचारलं नाही. जरूरच वाटली नाही. उमेश बरोबरच होता ना. शेवटी न्यूयॉर्कचे विमान कुठून सुटते असे तिथल्या एअरपोर्ट वरच्या इन्स्पेक्टरला त्यांनी धीर करुन विचारले. "आजोबा, तुम्ही किती वाजता आला ?" "सात वाजता. " "मग इतका वेळ कुठं होता, सव्वानऊ वाजताच न्यूयॉर्कचे विमान गेलं. तुमचं तिकीट कुठं आहे?" इन्स्पेक्टरने विचारले. "मुलाकडे." बाबांनी चाचरतच उत्तर दिले. "मग मुलाचं नाव सांगा आणि इथंच थांबा, मी विचारून येतो हं." फारच भला इन्स्पेक्टर भेटल्याबद्दल कुलदेवीचे हात जोडून त्यांनी मनापासून आभार मानले. दहा मिनिटांनी इन्स्पेक्टरनं माहिती सांगितली ती ऐकून बाबांवर आभाळ कोसळलं, पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांचा मुलगा उमेश त्यांना एअरपोर्टवर तसंच बसवून चक्क फसवून न्यूयॉर्कच्या फ्लाईटने एकटाच निघून गेला होता. असा कसा मुलगा गेला ? बाबांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. डोकं धरून बाबा मटकन् खालीच बसले. इन्स्पेक्टरनं पाणी आणलं. त्यांना बाकावर बसवलं. काय झालं ते विचारलं. बाबा फक्त मान हलवत राहिले. ५१ / तरंग अंतरंग