पान:तरंग अंतरंग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिगरी दोस्त पुण्यात आमचा एक शाळकरी दोस्त राहतो. त्याच्या समोरच्या बंगल्यात एक सुखवस्तू आई-वडील राहतात. वडील पेन्शनर, स्वतःचा कष्टाने बांधलेला हा बंगला. निवृत्तीपूर्वी वरचा मजला भाडेकरूंसाठी बांधून निवृत्तीच्या काळासाठी उदरनिर्वाह व सोबत, याची सोय करून निवांत सुखा-समाधानाने, हसत-खेळत सुरळीत जगणे सुरू होते. त्यातच अनेक वर्षांनंतर मुलगा उमेश मुद्दाम अमेरिकेहून भेटण्यासाठी आला आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. माऊलीला तर त्याच्यासाठी काय करू आणि काय नको झाले होते. अनेक वर्षांनी आलेला मुलगा बराच वेळ घरात दिसल्यामुळे माऊली स्वतःशीच पुटपुटली, 'पण हा गेला कुठं इतका वेळ?'

दुपारचे तीन वाजले तरी पत्ता नव्हता. एवढ्यात बेल वाजली आणि बरोबर तीन-चार अनोळखी व्यक्ती घेऊनच उमेश घरात आला. बरोबरच्या मंडळींना बुटासकटच सारं घर फिरून दाखवू लागला. आई-बाबा जेवणाच्या खुर्चीवर संभ्रमात एकमेकांकडं बघतच बसले. वरचा मजला दाखवून झाल्यावर सगळेजण सरळ बाहेरच्या दाराकडे चालू लागले. "तीन हजार बांधकाम व पाच हजार स्क्वे. फूटचा प्लॉट आहे," एवढंच उमेश बोलताना बाबांच्या कानावर आलं. सगळ्या मंडळीनी बंगला खाली वर पालथा घालून बघितल्यावर ते बाहेर पडले. उमेशही त्यांच्याबरोबरच गेला. संध्याकाळी पाच वाजता उमेश मोठ्या आनंदात परतला आणि आई-वडिलांना म्हणाला, "तुम्ही अजून जेवला नाहीत ? चला, अगोदर जेवायला बसूया.' 11 "चला बाबा, आज एक मस्त काम उरकून आलो. आता आपण सगळेच अमेरिकेला जाणार आहोत, कायमचे. " "अरे, हे काय एकदम ! आमचा जन्म इथं गेला. सगेसोबती इथं आहेत. सकाळी आम्ही दहा-दहाजण फिरायला जातो. येताना मस्त चहा पितो. दुखलं खुपलं तर एकमेकांना आधार असतो......आणि हे सगळं सोडून कायमचं जाणं कसं जमणार ?" बाबा सकाळपासून काय गडबड चालू आहे. त्याच्या अंदाजाने म्हणाले. "आई, तू तरी बाबांना समजावून सांग ना. याच्या तिप्पट मोठा माझा तिथं बंगला आहे. समोर व मागे आपल्या प्लॉटएवढं अंगण - परसबाग आहे. मुख्य म्हणजे तुमची नात, नातू आणि सून यांनी मला बजावूनच पाठवलं आहे. एकटे परत आलात तर घरात घेणारच नाही म्हणून. " उमेशने आपले म्हणणे पुढे रेटले. या शेवटच्या वाक्यानं मात्र डोळ्यांपुढं इतकी वर्षे एकदाही न पाहिलेली, फक्त लाडाने फोनवर बोलणारी दोन गोंडस नातवंड गळ्यात मिठी घालताना आजी-आजोबांना दिसली आणि हळूहळू विरोध मावळला. मुलानं आपलं कर्तव्य चोख पार पाडल्यानं धन्य वाटलं. तरंग अंतरंग / ५०