पान:तरंग अंतरंग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि रम्या एक आठवडा झाला तरी परतला नाही. शेवटी बहिणाबाईनं अण्णांच्या कानावर रम्याच्या वर्णनासकट गोष्ट घातली. अण्णांनी क्षणात हिशेब चुकता केला. पण या दोस्ताला चैन पडेना. रम्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार; तो काय पैसे बुडवणारा नव्हे. चौकशी केल्यावर कळलं, रम्याच्या स्कूटरला गंभीर अपघात झाला आणि तो दवाखान्यात आहे. झालं. दहा मिनिटांत आम्ही सारी दोस्त मंडळी दवाखान्यात हजर. सुदैवाने आम्ही पोचायला आणि रम्या शुद्धीवर यायला एकच गाठ पडली, आणि वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद आणि आम्हा सगळ्यांना पाहून आनंदाश्रू शाम्याला पाहिल्याबरोबर क्षीण आवाजात; पण हसत कष्टानं बोललेलं पहिलं रम्याचं वाक्य, "शाम्या, अरे त्या बिचाऱ्या बहिणाबाईंचे मी पैसे द्यायचेत रे. ' "तू काळजी करू नको, अगोदर बरा हो. पैसे दिलेले आहेत. ' हात जोडून 'थँक्स' म्हणाला आणि तेवढ्यात बहिणाबाई हातात चार ताज्या फळांनिशी हजर! "देवा, लवकर बरं कर रे काकाला,' म्हणत पिशवी उशाशी ठेवून, वहिनीच्या पाया पडून चालती झाली. रम्यानं वहिनींना सांगितलं, काढायला पिशवीत हात घातला. वाटतं.” 11 "फळं चिरून दे गं सगळ्यांना." वहिनींनी फळं "अरेच्या, बाई चुकून पैशांसकट फळं ठेवून गेली आमच्या दोस्तानं चुकते केलेले पैसे, आणि वर चार ताजी फळं देऊन गेलेल्या बहिणाबाईला सगळ्यांनीच न कळत हात जोडले होते. इतरांना आनंद वाटायचं ठरवलं, तर आपलं दुःख, दारिद्र्य नाही आड येत. दुःख आणि आनंद दुसऱ्यांना वाटावे, म्हणजे दुःख सहनीय आणि आनंद द्विगुणित होतो, असं वि. स. खांडेकरांनी सांगितलंय ते का उगीच ? आपण आपले ऊठसूट 'कलियुग, दुसरे काय?' असं ऐकतो, म्हणतो. मला मात्र अशा सर्वसामान्य माणसांचं वागणं रोज नवनवी उजळती दिशा आणि मार्ग दाखवून जोमानं पावलं टाकण्यासाठीचा माझा उत्साह द्विगुणित करतं. मनात येतं, 'कलियुगाची ऐशी तैशी. ' ४९ / तरंग अंतरंग