पान:तरंग अंतरंग.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवाची ही प्रश्नांची सरबत्ती ऐकून मी एक टॉवेल ओढून खसाखसा घाम पुसला. एवढ्यात 'आकाशवाणी' वाल्यांना आत्ताच 'सर्वात्मका सर्वेश्वरा... माझे म्हणा करुणाकरा' हे गीत आर्त स्वरात लावायला कुठल्या गाढवानं सांगितलं कोण जाणे. त्यामुळे भगवान एकदम कपाळावर हात मारून घेत चालता झाला की राव ! तेवढ्यात बेल वाजली. पाहतो तर दारात श्रीमती सारा राग घालवून दोन-चार बॅगा सामान भरून दारात उभी. काय गोड हसत होती राव! वाटलं, पटकन् उठाव... जाऊ दे सगळं, तुम्हाला सांगायची काय गरज आहे का ? बायकोनं आत आल्या आल्या तिथंच बॅगा उघडायला सुरूच केलं. बॅग उघडताच एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. एक मखमली बेडशीट. माहेरच्या दुभत्या म्हशींच्या दुधाच्या असली तुपाचा घमघमाट सुटलाच. देवासाठी नवे वस्त्र देव्हाऱ्यात खाली घालायला लाल मखमलीचे बाजूला जरीचे गोठ लावलेले चांगले हातभर कापड घरगुती घाण्यावरचे डबाभर, घरच्या (म्हणजे तिच्या) शेंगांचे तेल. नवे कोरे गुलाबी टर्किश मऊसूद टॉवेल आणि जाई, जुई, मोगरा, रातराणीच्या फुलांनी गच्च भरलेली परडी; तीही तिच्या अंगणातल्या वेलीवरची. नुसता घमघमाट घरभर. "अहो, तुम्हाला सांगते, गेले दोन महिने वेलीवर एकही फूल नव्हते. आणि आज एकदम अंगणच सगळं बहरलेलं ! गाव गोळा झालं नवल बघायला. "1 मला वाटलं मगाशी तडकाफडकी गायब झालेले भगवान बायकोच्या रुपात अवतरले की काय. म्हणून चक्क साष्टांग लोटांगण घातले. त्यावर बायकोला काहीच न कळून ती म्हणाली, 'अहो, असं काय करताय ? माझ्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार कसला करताय ? मी एवढी काही खरी रुसले नव्हते काही..." आणि पुन्हा अशी गोड हसली राव, आता तिला काय सांगणार कप्पाळ! मी मनात म्हटलं, 'देवाबरोबर खेळायचं म्हणजे तो नेहमीच 'एक मारी सब ... जितणारच की!' ४७ / तरंग अंतरंग