पान:तरंग अंतरंग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक मारी सब त्या दिवशी मी मराठी भावगीतं ऐकत बसलो होतो रेडिओवर. आज गुरुवार असल्यामुळं देवांचा नंबर लागला होता. 'देवा दया तुझी रे...' या गाण्यातून देवाला गूळ लावून झाला आणि लगेचच गुळाचा उपयोग झालाच असणार, याची खात्री पटून 'देव जरी मज कधी भेटला... माग हवे ते माग म्हणाला' हेही गीत देवाचं लक्ष असो व नसो; त्याच्या गळ्यात आपल्याला वर मिळाल्याचा एक आगाऊ हार घालून मोकळे. मी या विचारानं एकदम हसलो. 'हसायला काय झालं तुला ?' या हवेतून आलेल्या प्रश्नानं मी चक्रावून गेलो. इथं तर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. 'च्या आयला, देव पावला की काय?' मी पुन्हा खदखदून हसलो; पण या खेपेला प्रत्यक्ष भगवान समोर उभा ठाकला. मी एवढा मोठ्ठा 'आँ..!' केला की, माझ्या जबड्यातून पण 'विश्वदर्शन' बाहेर पडते की काय, या भीतीपोटी (खरं म्हणजे विश्वव्यापाबरोबर व्हिस्की, चिकनचे तुकडे बाहेर पडतील, याचीच भीती जास्त होती.) मी तोंड गपकन् मिटलं. "वत्सा, घाबरू नकोस." आजूबाजूला दुसरा कुठलाही वत्स नसल्याची मी चोरटी नजर खोलीभर फिरवून खात्री करून घेतली. आता तोंडभर हसण्याची पाळी देवाची होती, "चल, बास झाली नाटकं. माँगो क्या माँगने का है?" 'च्या आयला, याला हिंदी पण येतं की काय ?' मग मी पण राष्ट्रभाषा ताणण्याचा आटोकाट प्रयत्न करत बोललो, "देखो देवा, उसका क्या है, तुम एकदमच समोर उभा ठाक्या ना, तो हम एकदम बुचकळे में पड़ गया.... और हमारा बहुतच कोंडमारा हो गया ।" माझं हिंदी ऐकून देव रागावून मला म्हणाला ... " तुम अब एक शब्द भी हिंदी बोलेगा, तो एक सेकंद भी मैं यहाँ रुकुंगा नहीं।' देवानं दमच दिला की राव. मग मात्र मी लगेच माझी खुर्ची पुसून देवाला विनंती केली, "बसावे आपण." "काय घेणार," असं विचारताना चुकून मित्रसंगतीच्या सवयीनं उजव्या हाताचा अंगठा तोंडाकडे झटक्यात जाऊ लागला, तसं पटकन् डाव्या हाताच्या मुठीत त्या अंगठ्याला जेरबंद केलं आणि अंगठ्याला डास चावल्यामुळे खाजवत असल्याचा एकलंबरी अभिनय केला. यावर देव मिश्किल हसला आणि म्हणाला. हं. माग लवकर काय मागायचं ते. पण एक अट अशी की, तुझ्या मागण्या मागून झाल्या की माझ्या प्रश्नांची तू उत्तरं द्यायची. " नोकरी लागेपर्यंत शंभर तरी मुलाखतीचा, पोटासाठीचा अनुभव पाठीशी असल्यानं मी म्हटलं, "बेशक. " माझ्या मागण्या खालीलप्रमाणे मांडल्या. मी मुख्यमंत्र्यांपुढे पण आमच्या चाळीस हजार स्टाफच्या मागण्या याच पद्धतीने मांडल्या होत्या. त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. एवढ्यात रुसून माहेरी गेलेल्या सौ. ची याद आली. (आणि डोळे डबडबले, असे ४५ / तरंग अंतरंग