पान:तरंग अंतरंग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बापापुढं उभं करत. बाप पण पोराला काही पण न विचारता अगोदर एक खणखणीत मुस्कटात ठेवून देत असे. मग बाबांना विचारत, "काय केलं या भऽऽऽ बाबांच्या पुढं बाप पण शिवीगाळ टाळतो. पोरगं बाबांच्याकडं बघून "सांगू नका, पुन्हांद्या नाही करणार," असं खुणेनंच सांगे. "जा, अगोदर आतनं बाबांच्यासाठी खुर्ची घेऊन ये, " असं सांगून त्याची सुटका होई. 'तुमचं एकेका पोरावर लक्ष आहे, म्हणून गेल्या पंचवीस वर्षांत एक बी पोरगं वाया गेलं नाय बघा. कोण कलेक्टर, कोण इंजिनियर, कोण छोटा कारखानदार, कोण प्रोफेसर काय उगीच होतंय व्हय. धा जिल्ह्यात आपल्या गावाचं नाव उगीच न्हाईत घेत," असं म्हणत आतून पाटलीणबाई स्वतः हातात कपभर ताजं दूध घेऊन येत असे. मग चार गप्पा होत. 'काय केलं पोरानं,' याचं उत्तर मात्र बाबा खुबीने देत आणि आई-बाप निःश्वास सोडत. बाबांनी काही विशेष नाही म्हटलं की, निश्चिंत होत असत. असा दरारा त्यांचा होता. सगळ्यांना पक्के ठाऊक. हे गावाच्या भल्याचं आहे, म्हणूनच आमच्या गावात कधी खून, मारामारी, जाती-धर्माचा एक पण तंटा झाला नाही, गटाराच्या कडेला दारूडा कधी पडलेला दिसला नाही. आमच्या गावची एक वेगळी जोपासलेली संस्कृती होती. बाबांनी मुंबईच्या कारखानदारीच्या मोठ्या नोकरीचा त्याग करून वाडवडिलार्जित वाडा, शेती सांभाळून शाळेला आपली मोठी जागा देऊन गावातल्या पंचांना, बुजुर्ग लोकांना बरोबर घेऊन उत्तम शिक्षण संस्था चालवली होती. सारा गाव त्यांचा मान राखत असे, तो याचसाठी. गावातली एकी तर वाखाणण्यासारखी होती. असेच एकदा सुट्टी संपवून मला पण दुसऱ्या दिवशी शहरात कॉलेजसाठी जायचं होतं. त्यावेळी सकाळी सहाची अर्धी-पाऊण एसटी सगळ्या मुला-मुलींनीच भरत असे. प्रत्येक सुट्टीनंतर जवळजवळ सगळं गाव त्यांना निरोप द्यायला स्टँडवर पावणेसहालाच हजर असे. मी जायच्या आदल्या दिवशी सकपाळ्याचा बाळ्या पैलवान घरी आला की त्याला दारात बघून ‘'काय बाळासाहेब, घरी सगळे खुशाल ना? युवराजांना मालिश करायला आलाय वाटतं? या या." असं स्वागत बाबा करत. कुठल्याही बाळ्याला बाबा बाळासाहेबच म्हणत. "हो. तो उद्या जाणार ना. एक फसकलास मालिश तो बनता है,‘“ असं म्हणत बाळ्या सरळ स्वयंपाकघरातून आईकडून वाडगाभर तेल घेऊन येई. मग अस्मादिकांचं या दोस्ताकडून तासभर सगळं तेल जिरवून झकास मालिश होत असे. "तू तिकडं पण व्यायाम करतोस ना ? तुझी मजबूत 'टाटा'ची बॉडी सांगती रे. नाय तर बेहऱ्याचा पीटर. त्याला तुझ्या बाबांनी कसला घट्ट हाडाचा बनवलेला. आता पाप्याचं पितर वाटतंय." मसाज करता-करता बाळ्याच्या गप्पा सुरू झाल्या. शहरातल्या बिनधास्त कपड्यातल्या बाईकवरच्या पोरी, त्यांच्यामागं लाडा-लाडात सिगारेटी फुकत बसलेली पोरं, यांचं मलाही माहीत नसलेलं 'महाभारत'च बाळ्यानं ४३ / तरंग अंतरंग