पान:तरंग अंतरंग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा सोन्यासारखा गाव गावात बाळू नावाच्या पोरांची नुसती गर्दी आहे. म्हणजे तसे हे सगळे बाळासाहेब ; पण बुजुर्ग मंडळींचं बोलावणं म्हणजे मला बामनाचा बाळू खोताचा बाळू, एवढंच काय, मुलाण्याचा सुद्धा. खरं नाव... अब्दुल असून सुद्धा बाळूच. बहुतेक हे सगळे शहरात काही न काही शिकायला, एकेका खोलीत पाच-सहाजण राहतात; कुठलाही धर्म, जात, श्रीमंती- गरिबी आइ न येता. गावाकडनं आलेली मीठ-भाकर चतकोर - चतकोर वाटून घेतात. त्यात कुणाही पोरा पोरीचा वाढदिवसाचा मोठा गोडधोड भरलेला डबा आला.... तर पाच मिनिटांत फस्त होतो. उत्सवमूर्तीच्या वाट्याला आलाच तर एखादा तुकडा. घरून विचारलं, तर चव कशी होती हे सांगायला. आमच्या गावावरून डबे घेऊन येणाऱ्या कंडक्टरचं आणि आमचं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. वाढदिवसाचा डबा तर कंडक्टर स्वतः आणून मुलाकडे किंवा मुलीकडे देतो. वर एक छोटी 'कॅडबरी' ठेवून शुभेच्छा हमखास. माहेरहून निरोप घेऊन येणाऱ्या भावाचा जिव्हाळा त्यात ओतप्रोत भरलेला असे. एकदा असंच कंडक्टर डोळ्यांत कचरा गेल्याचा बहाणा करत, कुमार खोतचे वडील गेल्याची बातमी घेऊन आला. 'बस थांब्यावर उभी करून आलोय, असाच चल, ' म्हणून त्याच्या खांद्यावर गेलेल्या वडिलांचाच हात ठेवून घेऊन गेला. आम्ही सारेच कितीतर वेळ हा सारा 'मानवते'चा इतका उत्तुंग आविष्कार पाहून हेलावून गेलो. गहिवरून गेलो होतो.. मोठी वार्षिक सुट्टी संपत आली, तशी गावातल्या नामवंत मंडळींच्या घरोघरी जाऊन अक्षरशः पायावर डोकं टेकून निरोप घ्यायची पद्धत अजून गावातल्या कॉलेजकुमार- कुमारींनी पाळली आहे. त्यात माझ्या बाबांना भेटून आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलाही पोरगा - पोरगी, गावाची वेस ओलांडत नाही. दुसरा दंडवत म्हणजे गावच्या मारुतीला आणि मुजावरबाबांच्या मकबरीला. यात कुणाचाही धर्म-जात आड येत नाही. या बाबांनी व इतर बुजुर्ग गावकऱ्यांनी मिळून गावात कधी काळी मोठा तंटा मिटवून कायमची एकी निर्माण केली होती म्हणे! बाबांचा उरूस आणि हनुमान जयंती हा सर्व गावानं मिळून एकत्र साजरा करायचा समारंभ. झाडून आमचे सगळे गावकरी, तसेच परगावचे लोक पण हा सण कधीच चुकवत नाहीत. आमच्या अंगणात पहिली ते सहावीपर्यंतची झाडून सगळी पोरं-पोरी योगासनं, परसातल्या छोट्या मैदानात डबल बार, सिंगल बार, डंबेल्स, सूर्यनमस्कार वगैरेचा व्यायाम करायला सकाळी सहाला येतात. सहा ते सात. बाबांचा तसा दंडकच आहे. गावातल्या एकेका पोराला बाबांच्या या शिस्तीतून जायलाच लागतं; शिवाय बाबांच्या करड्या नजरेला एक पण पोरगं पानपट्टी गुटख्याच्या दुकानाच्या आसपास पण फिरकताना दिसलं, तर बाबा कान धरून त्याची सरळ घरापर्यंत 'वरात काढून तरंग अंतरंग / ४२