________________
अवघे धरू सुपंथ । "हॅलोऽऽ आप्पा आहेत का ?" आजोबा. नमस्कार! मी सुनीता बोलतेय. थांबा हं. देते आजोबांना फोन ! तुमची तब्येत कशी आहे?" मस्त. तुझा अभ्यास कसा चाललाय ? वेळ मिळतो का घरकामातून ?" "मिळतो थोडा. "थांब, अगोदर तुझ्या भावाला दे फोन. " "कुलकर्णी आजोबा नमस्कार ! माझी दहावीची परीक्षा कालच संपली. पेपर छान गेले. ताईनेच अभ्यास घेतला. " "हे बघ सुदीप, आता परीक्षा झाली ना ? मग ताईचे निम्मे काम तू कर. तिलाही छान मार्क्स हवेत ना मिळायला ? भाजी निवड, चिरून दे. केर काढ. बैठकीची खोली आवर. अंगण झाड. करशील ना?" हो आजोबा. आत्तापासूनच ... लग्गेच. आजोबांना देतो हं फोन." तुकारामशी थोडं बोलून फोन ठेवला.....आणि जुने दिवस एकदम आठवले. तुकाराम म्हणजे आमचा शाळासोबती. तुक्या. छान तुकाराम नाव; पण संत तुकारामांच्या बायकोसारखंच आम्ही त्याला कधीही तुक्याशिवाय हाक नाही मारली. त्याचं आयुष्य म्हणजे दुर्दैवाचा फेरा. स्वतः सज्जन संत तुकारामांचाच अवतार. कधी आमच्याशिवाय आपलं दुःख नाही सांगितलं कुणाला एक मुलगा. एक मुलगी. गृहकर्तव्यदक्ष बायको. छान चाललेलं सारं. आणि दृष्ट लागली.. ! एके दिवशी वयात आलेली पोर भलत्याचा हात धरून पळून गेली; कुणी म्हणतात पळवून नेली. पैशापरी पैसे, पोलिसांच्या सरबराईत गेले आणि लेकही हातची गेली. त्यानंतर घरात सून आली. ही दोन नातवंडं आली. पुन्हा सगळं सुरळीत झालं आहे, असं वाटत असतानाच अचानक एके दिवशी गहजब झाला. शेजारी खोली घेऊन अभ्यास करण्यासाठी आलेल्या एका देखण्या तरुण पोराबरोबर, आपल्या दोन चिमण्या पोरांना आणि नवऱ्याला सोडून सून होते नव्हते ते दागिने, पैसे घेऊन निघून गेली. मुलगा सैरभैर झाला. मित्रांना, समाजाला तोंड दाखवू नये म्हणून दिवाभितासारखा आपल्या खोलीत बंदी होऊन बसला. आई-बापानं, आम्हा मित्रांनी खूप प्रयत्न केले; पण तो कोमेजला तो कायमचा. दुर्दैवाचा फेरा कमी पडला की काय कळेना. आमच्या तुकारामची बायकोही अचानक गेली. घरी आता अंधाराशिवाय काही राहिलं नाही. आम्ही सारे मित्र मिळून अधून-मधून जात असतो त्याला धीर द्यायला. सुदैवाने तुकारामाच्या स्वतःच्या घरामुळे, पेन्शनमुळे पैशांची चणचण नव्हती. आणि ही नात कुठला समजूतदारपणा घेऊन जन्माला आली आहे, कुणास ठाऊक! आई गेलेल्या दुसऱ्या दिवसापासून ही परकरी पोर साऱ्यांची 'आई' झाली. कधीही तरंग अंतरंग / ४०