पान:तरंग अंतरंग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केला आहे. आपण गेल्यावर उगीच हुडकून कुठले तरी फोटो लावतात. उदबत्त्या संपल्या म्हणून आळस करतात, तसे काही यामुळं होणार नाही. " एवढं म्हणून मोठ्याने हे हसले. मीही मनात हसता हसता म्हटलं, "त्या मृत्यूची ऐशी तैशी." ही वृत्ती काही वाईट नाही. ...आणि "हे बघा," असं म्हणून माझा फ्रेम केलेला फोटो माझ्या कपाटातून काढून त्यांना दाखवला. हसण्याऐवजी त्यांचे डबडबून आलेले डोळे पाहणं माझ्या ताकदीच्या बाहेरचं होतं.

३९ / तरंग अंतरंग