पान:तरंग अंतरंग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खाडीलकर भाऊजींची गाडी थांबवली. " अरे हो. आज संध्याकाळी कट्ट्यावर एक 'ठराव' करायचा आहे, न चुकता गोखल्याला, बंड्याला आणि अशक्याला जिवंत आहेत तोपर्यंत बोलवून घे." "आत्ता ब्रेकफास्टला येतोस का?" असं यांनी विचारताच मी म्हटलं, "त्यांना याच म्हणावं, मस्त भरल्या मिरच्यांची तुपातली फोडणी देऊन कवडी दह्याचे पोहे करते. माझे दहीपोहे त्यांना खूप आवडतात. खाऊन रिकाम्या झालेल्या डिशमध्ये पाणी ढवळून पिऊन टाकतात. ' 11 "आलोच. वहिनींच्या हातचे दहीपोहे खाऊन लई दिवस झाले. वहिनींना विचार, संध्याकाळची 'कट्टा बैठक' तिथंच घेऊ देत का ? म्हणजे सगळ्यांनाच घेऊन येतो. ' "खाड्या, तू लेका माती मऊ दिसली की कोपरानं खणणार बघ. ये, ये. घेऊन 11 "अरे, वहिनींना विचार तरी. " "फोन घे गं, तूच बोल." असं म्हणत यांनी फोन माझ्याकडं दिला. "अहो खाडिलकर भाऊजी. आम्ही अजून देशस्थी व्रत सांभाळून आहोत. अजून दहा जणांना घेऊन या, दहीही आहे आणि पोहेही." मी बाणेदार उत्तर दिले. त्या संध्याकाळी या साऱ्या मित्रांची मस्त मैफल जमली. सोडून गेलेल्या दोस्तांना नैवेद्य दाखवून पोटभर दहीपोहे खाऊन सगळे तृप्त झाले. मला अखंड सौभाग्याच्या पोटभरून शुभेच्छा देऊन झाल्या. माझंही मन या बाळलीला पाहून सुखावलं. "वहिनी, दहीपोह्याबद्दल धन्यवाद ! सुऱ्या आम्हा चौघांना खांदा देऊन मगच जाऊ दे." अशी आमची इच्छा आहे. "हे बघा, दर रविवारी ब्रेकफास्टला या. एकेकाच्या आवडीचा नाष्टा करते; पण खांद्याची गोष्ट पुन्हा करू नका," असं अगदी डोळे वटारून, दटावून सांगत मी यांना म्हटलं, "अहो, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते आहे. आता करा तुम्हाला काय करायचा आहे तो ठराव. मी परत आल्यावर यांना पहिला प्रश्न विचारला, "काय ठराव केलात ?" "तुला सांगण्यासारखं नाही याचं उत्तर. " "पुन्हा दहीपोहे करायला सांगा; मग बघते मीही आहे आणि तुम्हीही." मी एकदम युध्दाचा पवित्रा घेतला. "अगं, उगीच आपली गंमत गं..." "हो ना, असू दे आता, सांगा बघू अगोदर काय ठराव केलात ?" प्रत्येकानं आपला एक-एक फोटो फ्रेम करून त्याच्याबरोबर चंदनाच्या उदबत्तीचा वर्षभर लावता येतील, एवढा पुडा आपापल्या कपाटात लपवून ठेवायचं" असा ठराव तरंग अंतरंग / ३८