पान:तरंग अंतरंग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोस्ती " आहे का सुऱ्या घरी ?" असं फोनवर वाक्य ऐकलं की एवढा राग येतो या गोखल्याचा. वास्तविक, मी या 'गोखलेंचा' असंच म्हटलं असतं; पण हा यांचा लंगोटीयार ना. काहीही बोलतो. सरळ "सुरेश आहे का, " म्हटलं असतं तर काय कवळी पडली असती? पण नाही; सुऱ्या म्हणे ! बरं, आता काय लहान आहेत का हे सगळे? सगळ्यांच्या पंचाहत्तऱ्या एकत्रित साजऱ्या केल्या ना हो; तरी अजून बालपण संपत नाही. - असो, एकमेकांवर जीव मात्र फार हं. आता एक-एक तारे गळून चालले, तसं जीव गलबलून जातात त्यांचे. दहा दिवस धड जेवत पण नाहीत. सारं बालपण पुनः पुन्हा उजळून काढतात. एकेकाच्या एकेक आठवणी. आमच्या यांना म्हणजे 'सुऱ्या'ला अजून सकाळचा पहिला चहा 'बेड टी' पाहिजेच. पण ते सुद्धा या दहा दिवसात चहापण पित नाहीत. सगळी गँग उदास होऊन जाते. संध्याकाळी सगळे निरोप दिलेल्या मित्राच्या आठवणीत एकमेकांचे डोळे पुसत आठवणी उगाळत बसतात बिचारे ! माझंही मन एकदम गलबलून जातं; पण ही दोस्ती बघणं कुठंतरी खूप बरं वाटतं. नाही तरी आयुष्यात अशी सोबत, संगत नसेल तर सगळं जीवन मचूळ. एवढ्यात अंघोळ करून हे आलेच. "कुणाचा फोन होता - खाड्याचा, अशक्याचा का गोखल्याचा ?" "गोखलेंचा. " आँ...! चलाऽऽऽ! बरे झाले; म्हणजे जिवंत आहे तर गोखल्या..." "अहो काय , तुमच्या कुणाच्याही जिभेला हाड नाही बघा. शुभ बोलावं." "अगं, आमचं हे असंच चालायचं. उरलेले दिवस कुणाचे आणि किती कुणाला माहीत ? मजा करून हसणे, एवढंच आता आम्हाला जमतं. " तेवढ्यात पुन्हा फोन वाजलाच. मी फोनचा स्पीकर 'ऑन' केला आणि यांचं सुरू झालं..... काय रे खाड्या, आज दहालाच उठलास की काय ? का स्वप्नातून रंभा चहा करायला निघून गेली ?" " रंभा कुठली ; केळीवाली आली होती दार ठोकत 'आजोबा केळी घ्या. संपलीत घरची.' ती बाई, आमची सुलु गेल्यापासून अगदी मनापासून काळजी घेते हो. अरे, कधी-कधी भाकरी आणि मस्त झणझणीत चटणी व कोरडा फर्मास खमंग घट्ट झुणका गुपचूप ठेवून जाते. कुठल्या जन्माची पाठची बहीण होती कुणास ठाऊक ! मीही दिवाळीत तिच्या घरच्या साऱ्यांची मिठाई त्यांच्या घरी भल्या पहाटे जाऊन देऊन येतो. नातवंडं खूष होतात रे ते पाहून दूर अमेरिकेतल्या माझ्या नातवंडांचे चेहरे आठवतो. झालं.' "खाड्या, खाड्या शेंटी होऊ नकोस, फोन का केलास ते सांग?" यांनी ३७ / तरंग अंतरंग