पान:तरंग अंतरंग.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुकुटाला हात घालणार, तोच आपल्या दोन बाहूंनी तो त्यांनी माथ्यावरच घट्ट धरून ठेवला. त्यांचा माणसावरचा विश्वास केव्हाच उडाला असावा. निवांतपणे बसल्यावर मी विचारले, “काय घेणार?" यावर त्यांचा त्रासलेला चेहरा पाहून मी लगबगीने म्हटले, "तसलं काही नाही, चहा-कॉफी हो." "काहीही नको, आत्ताच येताना ताक पिऊन आलो." इंद्रदेव उत्तरले. 'ऑ..! आता तुम्हाला ताक मिळायला लागलं काय?" इंद्राच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून मी लगेचच म्हटलं, "तक्रम् शक्रस्य दुर्लभम्' असं आम्हाला सांगून, लहानपणापासून नको असतानासुद्धा, तुमच्या नावावर जबरदस्ती ताक प्यायला लावायचे हो." 1 इंद्र गडगडून हसले “थांब. उगीच मला हसवू नकोस, मी का आलो आहे ते सांगतो. तुझी पुरुषांनी 'सती' जाण्याची शंका ऐकून मी तातडीने आलो. " मला पामराला एकदम भरून वगैरे आले हो! मी एकदम पायावर डोके ठेवून हाताबरोबर अभिषेक करून घेतला. - "ऐक. पूर्वी पतीने सती जाण्याची पण पद्धत होती; पण सती गेलेले पुरुष स्वर्गात आले आणि रंभा - उर्वशी वगैरेंच्या तक्रारी माझ्या कानावर रोज यायला लागल्या 'इंद्रराजे, हे पृथ्वीवरचे पुरुष आपल्या बायकोबरोबर सती गेले.... आणि स्वर्गात आले. इथे आल्यावर स्वतःच्या बायकोकडे बघतही नाहीत; सारखा आम्हाला नृत्य करण्याचा आग्रह धरतात. आणि मराठी पतिदेव तर चक्क लावणीचीच फर्माईश करतात. आमचा जीव थकून जातो.' तेव्हा, आम्ही तातडीने फक्त स्त्रियांनीच सती जाण्याचीच पद्धत पाळण्याची आज्ञा पृथ्वीवर पाठवली. कळले ना ? झोप आता !" इंद्रदेव गेले आणि झोप उडाल्याने कितीतरी वेळ त्याच आसनावर बसून, ताक पित, मी 'इंद्रस्नाना'चा उपभोग घेत बसलो.

३३ / तरंग अंतरंग