पान:तरंग अंतरंग.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पतीचे 'सती' जाणे सती जायची पद्धत होती तेव्हा पतीच्या देहावसानाने व्यथित झालेल्या 'त्या' वीर स्त्रिया पतीचा देह आपल्या मांडीवर घेऊन सरळ चितेवर बसत आणि इतर स्त्रिया हे पाहून स्त्रीजन्म धन्य झाल्याचे मानून त्या चितेवर चढणाऱ्या स्त्रीला देवीप्रमाणे पूजत असत. तिच्या पायावर डोके टेकून अश्रूंनी पाय धूत असत. नंतर तिचा मोकळा सोडलेला केशसंभार चुंबत असत. या केसांची संख्या एक कोटी गृहीत धरत आणि एका केसासाठी एक कोटी वर्षांचे स्वर्गी राहणे त्या सतीचे नक्की झाले, असे कौतुकाने तिला सांगत. अशा जिवंत स्त्रीचे 'स्वर्गारोहण' डोळे भरून पाहायला सारा गाव लोटत असे आणि बिनदिक्कत त्या दोघांना अग्नी दिला जात असे. तशी प्रथाच होती. काय धाडस होते ते. असे धाडस स्त्रियाच करू जाणे.. ! माझ्या मनात आले जर आपल्या अर्धांगिनीचा मृत्यू झाला, तर पुरुषाने 'सती' जायची पद्धत का नव्हती ? पुरुषाचे केस अगदी कोटी नसले तरी लाखभर असतीलच की. अगदी टकल्या असला तरी दोन-चार हजार तरी असतीलच की; मग तेवढी वर्षे तरी स्वर्गात चैनीत राहायला मिळाली असतीच की; पतीने 'सती' जाण्याची प्रथा का बरे नसेल ? खूप विचार करूनही काही उत्तर सापडलं नाही. विचार करून थकल्यावर मला गाढ झोप लागली... आणि गंमत म्हणजे माझ्या या पतीने 'सती' जाण्याच्या कल्पनेचा थेट इंद्रानेच धसका घेतला. अजून झोप लागून दहा-पंधरा मिनिटे झाली असतील- नसतील, तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं तर चक्क इंद्रदेव तातडीने अक्षरशः धापा टाकत हजर झालेले! मी पटकन गॅलरीतून वाकून 'ऐरावत' आमच्या गल्लीत कुठं 'पार्क' केला आहे ते बघितलं; पण काही दिसला नाही. एक गाढव मात्र दारासमोरच करहुंगत होतं. ते पाहून इंद्र रागावतील म्हणून त्यांच्या वाहनाचा विषय मी काढला नाही; पण या प्रवासाला किती वेळ लागला," ते मात्र कुतुहलापोटी विचारलेच. ते म्हणाले, "दोन सेकंद " अंतर नक्की ठाऊक नसल्याने प्रतिकिलोमीटर किती वेग ते काढायचा नाद मी सोडून दिला ; शिवाय त्यांच्या घामेजल्या चेहऱ्याकडे बघून मलाच गलबलून आले. मी फ्रीज उघडून गार पाण्याच्या दोन-चार बाटल्या 'तबका'त ठेवून त्यांच्या पुढे धरल्या. त्या त्यांनी गटागटा पिऊन टाकल्या. ते प्रत्येक बाटली पिण्यापूर्वी दीर्घ श्वासाने हुंगून ते पाणीच असल्याची खात्री करून घेत होते. मी गालातल्या गालात हसत असल्याचे पाहून इंद्रदेव म्हणाले, " हल्ली तुमच्या फ्रीजमधल्या बाटल्यांच्या कंटेंटची खात्री नाही आम्हाला. (इंद्रालाही इंग्लिश येते, हे जरा पचवायला अवघड गेले.) उगीच लडखडत स्वर्गात पाय ठेवला तर इंद्रासन गमवावं लागायचं आम्हाला. 11 मी तत्परतेने माझ्याकडचे आसन पुढे सरकवले. त्यांना बसण्याची विनंती केली. त्यांच्या डोक्यावरचा जड मुकुट काढून बाजूच्या 'टी-पॉय' वर ठेवावा, म्हणून मी तरंग अंतरंग / ३२