पान:तरंग अंतरंग.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गटागटा पित होतो. अचानक एक काळाकुट्ट ढग आला आणि आपल्या अक्राळविक्राळ शरीरात त्यानं बिचाऱ्या चंद्राला गुरफटून टाकलं, कासावीस करून टाकलं. किती धडपडला बिचारा चंद्र. पण विळखा सुटायची काही लक्षणं दिसेनात.... एवढं लिहिलं आणि हा गुंता कसा सोडवावा. याचा विचार करायला मान वर केली. तर जवळच बाई उभ्या. माझ्या पाठीवरून हळुवार फिरणारा त्यांचा हात आणि भरून आलेले डोळे कळवळून सांगत होते की, त्यांनी सारं वाचलंय. घंटा झाली. मी तो निबंध कधीच पुरा करू शकलो नाही.....'त्या' रात्री बाई जवळून गेल्याचा तो भास नव्हता तर... ३१ / तरंग अंतरंग ܀܀