________________
खांबाच्या आधारावर पडकं छप्पर तसंच दिसत होतं. आत जाऊन म्हाताऱ्या बापाच्या सुरकुतल्या देहाला मिठी मारायची. आईच्या खोकून-खोकून थकलेल्या पाठीवरून हात फिरवायची त्याची हिंमत झाली नाही. कुतुहलाने 'त्याच्या 'कडं वळणाऱ्या ओळखीतल्या नजरा चुकवायला डोक्यावरची हॅट अजून खाली ओढली आणि तडक स्टैंड गाठलं. लक्षात आलं, आता 'त्याच्या' शहरी हाय-फाय कुटुंबात आणि आई-बापांत एक फार मोठी दरी पसरली आहे. ती बुजवणं शक्य नाही. बस आल्यावर इकडे तिकडे न बघता तडक बसमध्ये चढला. तंद्रीतच कंडक्टरशेजारी बसला आणि डोळे मिटले. सारं बालपण एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकलं; आठवलं, ते डोंगरावर शेळ्या घेऊन जाणं. कोवळं कोकरू हाताच्या मिठीत छातीवर धरणं. त्यानं किळस येऊन एकदम हात झटकले, तसं कंडक्टरनं कागद, पेन्सिल बाजूला सरकवून त्याच्याकडं पाहिलं. येतानाचाच तो कंडक्टर होता. त्याने त्याला ओळखले आणि म्हणाला, "काय साहेब, एवढा ऐवज सोडून गेलात ? किती हाका मारल्या, सकाळी तुम्ही उतरताना तुमची वर ठेवलेली बॅग तशीच ठेवून उतरलात. हे घ्या. तुमच्या पोराची पण फी भरायची असेल ना ?" "अहो, नको राहू दे तुमच्याकडेच ! भरा फी मुलाची. मुलगा मिळवता झाला की, त्याच्याकडून व्याजासकट वसूल करेन. नाही म्हणू नका प्लीज..." त्यानं असं म्हटल्यावर कंडक्टरला काय बोलावं तेच सुचेना. बस थांबली आणि 'तो' तडक खाली उतरला. खिडकीबाहेर तोंड काढून कंडक्टरने भरल्या डोळ्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. 'तो' दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिला. आज त्याला त्याचा 'विठूराया' भेटला होता....! २९ / तरंग अंतरंग