पान:तरंग अंतरंग.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवा थोडा वेगाने पुढे गेला. तो तिच्या साथीदाराचा समजून मी सुन्न होऊन हात जोडले. आता तरी बरोबर जोडीने वाहत गेला असता तर.... कितीतरी दूर-दूरवर दिसेपर्यंत ती ते दोन्ही दिवे पाहत होती. कुणास ठाऊक, पुनर्जन्मातल्या आशेचा प्रकाश पाहण्यासाठीची ती धडपड होती का ? तिचा एखाद्या शंभर वर्षांपासून एकाच जागी उभा राहिलेला, दगडी पुतळा झाला होता आणि चेहरा..... बर्फासारखा थिजलेला. तरंग अंतरंग / २४