पान:तरंग अंतरंग.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पोच किती असणार! उद्या पहाटे तीच बस, तोच चालक, तोच कंडक्टर तुला तुझ्या गावी घेऊन जाईल. आता झोप...!" मी पुन्हा एकदा त्या 'महापुरुषा'च्या चरणी माथा टेकला आणि चटईवर आडवा झालो. जाग आली, तेव्हा कंडक्टर माझ्या खांद्यावर हात दाबून मला गदागदा हालवत होता. मला जिथे सोडून गेले होते, तिथेच आणि तसाच आडवा झोपलेला बघून त्यांना वाटलेले आश्चर्य त्यांच्या तोंडावर दिसत होते. चालकही खाली उतरला आणि मी ज्या दिशेने आलो, तिकडे तोंड करून उभं राहून त्या दोघांनी हात जोडले आणि माझ्याकडे अत्यंत आदराने पाहत मला घेऊन आत बसले. मागे, 'त्या' लांबलचक, स्वच्छ, गुळगुळीत दगडाकडे पाहत कितीतरी वेळ मी हात जोडून एका 'वेगळ्या'च धुंद, शांत चित्ताने बसून होतो. मला काही तरी नवीन गवसले होते, एवढे खरे; पण कुठे ? केव्हा ? कुणामुळे ? का ? 'त्या'... 'त्या' थंडगार दगडामुळे काहीच उमजत नव्हते. १९ / तरंग अंतरंग