पान:तरंग अंतरंग.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुसंस्कृतच असायला हवं यावर पूर्ण ध्यान दिलं आहे. ते ही हवा तो धर्म पाळून. तरीही माझी कन्या आमच्या शब्दाखातर कुठलाही त्याग करेल. तुम्ही काळजी करू नका. मी मुलगा पाहिलेलाही नाही. पण तुम्ही यात लक्ष घातलंय इतकंच आमच्यासाठी पुरेसं आहे. ' दुसऱ्याच दिवशी सकाळीच बाप्याकडे आम्ही दोघेही गेलो. हळूहळू त्यांना सारं समजावून सांगितलं आणि त्याला बरोबर घेऊनच रियाचं देवघर गाठलं. बाप्यानं त्या देवासमोर साष्टांग नमस्कारच घातला. त्याच्या चेहऱ्यावरचं जाळं, वळचणीतलं कोळीष्टक झाडून स्वच्छ केल्यासारखं साफ झालं होतं. समाधानी चेहऱ्यांनी घरी परतताना मला मनोमन वाटलं, 'हे वादळ तिसऱ्या नव्याच धर्मासाठीचं जिहाद ठरावं. '

तरंग अंतरंग / १४