पान:तरंग अंतरंग.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकत्र कुटुंब व्यवस्था आजकाल एकत्र कुटुंब हा विषय चर्चेचाही राहिलेला नाही. त्यामुळे नातवंडे- परतवंडे आजोबा-आजीच्या अंगा-खांद्यावर नाचण्याचा प्रश्नच उरलेला नाही. आजी- आजोबांचे बोट धरून देवळात जाणे, कधी-कधी तेल लावून आजी-आजोबांचे पाय, हाताने किंवा पायावर उभे राहून चेपून त्यांना त्यांचा स्वर्गीय आनंद मिळवून देण्याचे सुखही हरवून गेलेय. आई किंवा बाबा रागावल्यास पळत जाऊन आजी-आजोबांच्या गळ्यात पडून त्यांची बिनधास्त ढाल करण्याचे भाग्य ही बालगोपाळ मंडळी हरवून बसली आहेत. शाळा सुटूनही घराचे कुलूप बघून हिरमुसले होऊन आजोबा-आजीच्या मांडीऐवजी कधी-कधी पायरीवरच बिचारी झोपून जातात. जगणे साधे-सोपे, सरळ नसल्याचे कोवळ्या वयातच ही मुले शिकून जातात. हे झाले बालपण; पण मोठेपणी पण या वयस्क, अनुभवी मंडळींच्या साथसोबतीची उणीव जाणवते. अनेक कठीणप्रसंगी तरुणांना दिलासा देऊन निदान दुःख थोडे हलके होण्याचेही दिवस आता जवळजवळ हरपले आहेत. १९७०-७१ चा काळ होता. अजून बऱ्यापैकी एकत्रित राहण्यासाठीचा तो धडपडीचा काळ होता. माझ्या पुतण्यासाठी... श्रीकांतसाठी सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार होता. त्यासाठी १० हजार रुपये भरायचे होते. तेव्हा एवढे पैसे भरायचे ही सोपे नव्हते. अजून तो प्रसंग डोळ्यांपुढे स्वच्छ उभा राहतो. काकांनी पुढाकार घेऊन आम्हा पाच भावांना आणि वडील नाना यांना एकत्र बसवून दार बंद करून असा विषय मांडला. पाच भावांनी दोन-दोन हजार दिले तरच हे शक्य आहे. ५०-५० लाख रुपये डोनेशन देणाऱ्या आजच्या पालकांना दोन हजार रुपयांची ही गोष्ट हास्यास्पद वाटेल; पण त्या काळी हे काम सोपे नव्हते. काकांनी सांगितले, म्हणजे ते काम झालेच पाहिजे, एवढेच आम्हाला माहीत होते. आम्ही कसलाही विचार न करता होकार दिला. नानांनी हात जोडून भरून आलेले डोळे मिटून 'जगदंबऽऽ जगदंबऽऽ' म्हटल्याचे आजही मला स्पष्टपणे नजरेसमोर दिसते... ऐकूही येते. माझा तर पगारच तेव्हा महिना २५०-३०० रुपये. महिन्याचा खर्च असा असायचा की कधी १० रुपये कमी पडायचे; कधी उरायचे. मग जिवलग मित्रमंडळी कामी यायची. अर्थात, त्यांचीही परिस्थिती अशीच असायची. आजच्या पिढीने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कुणीही 'बायकोला विचारून सांगतो,' असे म्हटले नाही. अर्थातच, सर्वांच्या सौं.नी पूर्ण सहकार्य करून लोन फिटेपर्यंत कुठे काटकसर करायची, हे लगेचच ठरवून टाकले. मला आठवते तेव्हा दूध १ रुपये लिटर होते. माझ्या सौ.ने अर्धा लिटर रतीब कमी केला. तिसऱ्या मजल्यावर पाणी भरण्यासाठीची बाई व धुण्याची बाई कमी केली. ..आणि हे मला एका शब्दानेही न विचारता, फक्त श्रीकांत डॉक्टर होण्यासाठी केले. हे सारे पुतण्यासाठी. पुढे कॅन्सर झाला, तेव्हा श्रीकांत हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ बसून तरंग अंतरंग / १२०